भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत
कॅनबेरा, 22 नोव्हेंबर (हिं.स.)भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने उपांत्य फेरीत लक्ष्यने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या चाऊ ट
लक्ष्य सेन


कॅनबेरा, 22 नोव्हेंबर (हिं.स.)भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने उपांत्य फेरीत लक्ष्यने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या चाऊ टिएन-चेन (चायनीज तैपेई) याचा १७-२१, २४-२२, २१-१६ असा पराभव केला. सामना सुमारे ८६ मिनिटे चालला आणि या सामन्यात लक्ष्यचा धैर्य आणि संयम स्पष्ट दिसत होता.

पहिल्या गेममध्ये लक्ष्यची सुरुवात डळमळीत झाली आणि चेनने त्याच्या अचूक प्लेसमेंट आणि आक्रमक खेळामुळे ११-६ अशी आघाडी घेतली. लक्ष्यने काही प्रभावी शॉट्स मारले. तर चुकांच्या मालिकेमुळे त्याला पहिला गेम गमवावा लागला.

पहिल्या गेममध्ये लक्ष्यची सुरुवात डळमळीत झाली आणि चेनने त्याच्या अचूक प्लेसमेंट आणि आक्रमक खेळामुळे ११-६ अशी आघाडी घेतली. लक्ष्यने काही शानदार शॉट्स मारले. पण चुकांच्या मालिकेमुळे अंतर वाढले. आणि लक्ष्यने हा गेम 24-22 अशा फरकाने जिंकला.

निर्णायक गेममध्ये लक्ष्य सेनने आपला खेळ आणखी उंचावला. य़ा गेममध्ये चेनने आपला वेग कमी केल्याचे दिसून आले. लक्ष्यने सतत दबाव कायम ठेवला आणि सुरुवातीला ६-१ अशी आघाडी घेतल्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. उत्कृष्ट नेट ड्रॉप्स, अचूक स्मॅश आणि आत्मविश्वासपूर्ण शॉट्समुळे लक्ष्यने अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी २१-१६ असा गेम जिंकला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande