न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट
वॉशिंग्टन, २२ नोव्हेंबर (हिं.स.) व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि न्यूयॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांच्यातील बैठक झाली. या बैठकीनंतर ट्रम्प यांनी ममदानी यांना न्यूयॉर्क सुरक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी पाठिंबा द
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट


वॉशिंग्टन, २२ नोव्हेंबर (हिं.स.) व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि न्यूयॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांच्यातील बैठक झाली. या बैठकीनंतर ट्रम्प यांनी ममदानी यांना न्यूयॉर्क सुरक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले, तर ममदानी यांनी ट्रम्प यांचे कौतुकही केले.

न्यूयॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. बैठकीनंतर ट्रम्प म्हणाले, न्यूयॉर्क सुरक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी आम्ही नवनिर्वाचित महापौरांना पूर्ण पाठिंबा देऊ. ममदानी यांनी राष्ट्रपतींचे कौतुक केले आणि म्हटले की, ही चर्चा मतभेदांवर नव्हे तर न्यू यॉर्कवासीयांच्या गरजांवर केंद्रित होती.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर संभाषणाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना ममदानी यांनी लिहिले, न्यूयॉर्कमधील काम करणारे लोक मागे राहिले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत शहरात, पाचपैकी एक व्यक्ती 2.90 डॉलर ट्रेन किंवा बसचे भाडे देखील घेऊ शकत नाही. मी ट्रम्प यांना सांगितले की, या नागरिकांना पुन्हा आपल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ठेवण्याची वेळ आली आहे.

४ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी, ट्रम्प यांनी इशारा दिला होता की, जर ममदानी जिंकले तर ते न्यूयॉर्क शहरासाठी आर्थिक आणि सामाजिक आपत्ती असेल. ममदानीच्या विजयी भाषणाबद्दल विचारले असता, ट्रम्प यांनी त्यावर अत्यंत संतप्त अशी टीका केली आणि म्हटले की जर त्यांनी वॉशिंग्टनचा आदर केला नाही तर त्यांना यश मिळण्याची शक्यता नाही.

ममदानी ट्रम्प यांना त्यांचा सर्वात मोठा शत्रू म्हणत असताना, त्यांनी सांगितले की, ते त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कठोर कारवाई करत आहेत. तरीही स्थलांतरित हे न्यूयॉर्क शहराची ताकद आहेत आणि आता शहराचे नेतृत्व एका स्थलांतरिताच्या हाती असेल. ममदानी म्हणाले की, जर हुकूमशहाला रोखण्याचा काही मार्ग असेल तर तो म्हणजे ज्या परिस्थितीमुळे त्यांना सत्ता मिळाली त्या परिस्थिती दूर करणे.

या जोरदार वादविवादांमध्ये, शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या चर्चेवर सर्वांचे लक्ष होते. पण अपेक्षेपेक्षा विपरीत, दोन्ही नेत्यांमधील चर्चा अतिशय शांत वातावरणात पार पडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande