
मुंबई, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। मराठी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये अभिनेता आनंद ओकसोबत तिचा अधिकृत घटस्फोट झाल्यानंतर केवळ तीन महिन्यांत अभिनेत्री दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर शुभांगीनं शेअर केलेल्या केळवणाच्या व्हिडिओनंतर या चर्चेला आणखी उधाण आलं आहे. या व्हिडिओमध्ये शुभांगी आगामी विवाहाची तयारी करताना दिसत आहे.
कोणाशी करणार लग्न?
‘संगीत देवबाभळी’ नाटकातून रसिकांना भुरळ घालणारी शुभांगी सदावर्ते आता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचे निर्माता सुमित म्हशेळकरसोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या मित्रपरिवाराने आयोजित केलेल्या केळवणाचे खास क्षण अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केले.
शुभांगीनं पोस्ट शेअर करत
जुळली गाठ गं
असं कॅप्शन देत मित्रांचे आभार मानले. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सुमित म्हशेळकरचीही पोस्ट चर्चेत
सुमितनंही केळवणाचा व्हिडिओ शेअर करत
नवराई माझी नवसाची
असं लिहिलं आहे. दोघांच्या पोस्ट्स व्हायरल झाल्या असून, त्यांच्या लग्नाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता शुभांगी व सुमित यांचा विवाहसोहळा कधी पार पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर