रियलमी P4x 5G लवकरच होणार लॉन्च
मुंबई, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। रियलमीनं P4 5G मालिकेत आणखी एक दमदार स्मार्टफोन आणण्याची घोषणा केली आहे. रियलमी P4x 5G नावाचा हा नवा फोन लवकरच भारतीय बाजारात येणार असून त्याची अधिकृत मायक्रोसाइट फ्लिपकार्टवर लाइव्ह करण्यात आली आहे. मायक्रोसाइटवरून फो
Realme P4x 5G


मुंबई, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। रियलमीनं P4 5G मालिकेत आणखी एक दमदार स्मार्टफोन आणण्याची घोषणा केली आहे. रियलमी P4x 5G नावाचा हा नवा फोन लवकरच भारतीय बाजारात येणार असून त्याची अधिकृत मायक्रोसाइट फ्लिपकार्टवर लाइव्ह करण्यात आली आहे. मायक्रोसाइटवरून फोनच्या काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा खुलासा झाला असून कंपनीनं “Built to be Fastest” ही टॅगलाइन वापरून हा फोन खास गेमिंगसाठी डिझाईन झाल्याचे संकेत दिले आहेत.

रियलमी P4x 5G मध्ये होल-पंच स्टायलिश डिस्प्ले आणि अतिशय पातळ बेजेल्स मिळतील. GT Mode मध्ये हा फोन 90 fps गेमप्ले सपोर्ट करणार असून उच्च ग्राफिक्स गेम्स कमालीच्या स्मूथ पद्धतीने चालतील. विशेष म्हणजे, एकावेळी 90 अ‍ॅप्स सुरू असतानाही लॅग येणार नाही असा दावा कंपनीनं केला आहे. फोनमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग तसेच बायपास चार्जिंग सपोर्ट असेल, ज्यामुळं गेमिंग दरम्यान फोन गरम न होता परफॉर्मन्स कायम राहील.

या फोनचं सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे व्हेपर चेंबर (VC) कूलिंग सिस्टम. या किंमत श्रेणीत VC कूलिंग देणारा हा पहिलाच फोन असल्याचे रियलमी सांगते. त्यामुळे दीर्घकाळ हेवी गेमिंग किंवा मल्टिटास्किंग करतानाही परफॉर्मन्समध्ये कोणताही फरक जाणवणार नाही. हा फोन याआधी फेब्रुवारीत लॉन्च झालेल्या Realme P3x 5G चा उत्तराधिकारी असणार आहे.

दरम्यान, रियलमी गेल्या ऑगस्टमध्ये P4 Pro 5G आणि P4 5G हे मॉडेल्स लॉन्च केली होती. त्यापैकी P4 Pro 5G मध्ये 6.8 इंच Full-HD+ AMOLED (144Hz) डिस्प्ले आणि Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर होता. त्यामुळे नवा P4x 5G याच श्रेणीत अधिक मजबूत गेमिंग फिचर्ससह उतरणार अशी शक्यता व्यक्त केली जाते.

आता सर्वांच्या नजरा रियलमी P4x 5G च्या किंमत आणि लॉंच डेट कडे लागल्या आहेत. कंपनी लवकरच त्याबाबतची घोषणा करणार असल्याचं सांगितलं आहे. हा फोन बजेट गेमिंग बाजारात Poco, Moto आणि iQOO सारख्या ब्रँड्सना कडवी टक्कर देणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande