
गुवाहाटी, 22 नोव्हेंबर (हिं.स.)भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रथम फंलदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने दिवसअखेर 6 विकेट्स गमावून 247 धावा केल्या. कुलदीप यादवने तीन विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटचे नवीन मैदान असलेल्या गुवाहाटीने सत्र ब्रेकमध्ये व्यत्यय आणला असेल. पण कोलकाता आणि पर्थमधील गोंधळादरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये काही प्रमाणात सामान्यता आणली. पहिला दिवस काहीसा भारताच्या बाजूने गेला.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. चांगल्या खेळपट्टीवर, त्यांच्या सर्व फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पण कोणीही पन्नास धावा करू शकले नाही. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सत्रात चांगली फलंदाजी केली आणि चहापानाच्या ब्रेकपूर्वी, बुमराहने मार्करामला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. चहापानानंतर लगेचच कुलदीपने रायन रिकल्टनला बाद केले.
बावुमा आणि स्टब्स यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तिसऱ्या सत्रात कुलदीप आणि जडेजाने चांगली गोलंदाजी करत आफ्रिकन फलंदाजांना धावा काढण्यापासून रोखले. स्टब्स ४९ धावांवर कुलदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला. जडेजाने कर्णधार बावुमाला ४१ धावांवर बाद केले. कुलदीपने विआन मुल्डरला देखिल बाद केले.त्यानंतर टोनी डी जॉर्गी आणि मुथुसामी यांनी दक्षिण आफ्रिकेची आणखी पडझड होऊ दिली नाही. पण मोहम्मद सिराजने डी जॉर्गीला बाद करत दिवसाच्या शेवटी भारताला आणखी एक विकेट मिळवून दिली. आता कसोटीच्या दुसऱ्या दिवशई भारतीय संघ आफ्रिकेला 300 धावांच्या आता रोखण्यास प्रयत्नशील असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे