
कोल्हापूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। या दुनियेच्या आड दडलेलं एक गूढ रहस्य घेऊन ओएलसी-आफ्टर लंडन कॅफे हा चित्रपट 28 नोव्हेंबरला प्रदर्शीत होत आहे. मराठी आणि कन्नड चित्रपट निर्माते दिग्दर्शक यांनी एकत्र येऊन मराठी, कन्नड आणि हिंदी अशा तीन भाषेत हा चित्रपट बनवला असल्याचे या चित्रपटातील प्रमुख कलाकार अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि विराट मडके यांनी कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी ते म्हणाले की मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रत्यक्ष चित्रित केला असून हिंदीमध्ये त्याचे रूपांतरही केले आहे.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की हा चित्रपट नक्षलवादी संघटनेच्या जीवनावर आधारित असला तरी त्यामध्ये नक्षलवादाची कोणतीही उदातीकरण किंवा समर्थन केलेले नाही फक्त त्यांची जीवनशैली आणि त्यातून प्रेम संघर्ष आणि करमणुकीचा मिलाप घडवून आणलेला आहे ही एक काल्पनिक कथा असली तरी त्यातून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मैत्री, विश्वासघात, आणि लपलेल्या रहस्यांच्या या गुंत्यातून बाहेर पडताना हा चित्रपट कोणतं रहस्य मागे सोडणार याची उत्कंठा वाढवणारा आणि रहस्यमय थराराने, एक्शन पॅक्ड सीन्सने भरलेला हा सिनेमा आहे कलाकारांचा दमदार अभिनय, दिग्दर्शकाचे उत्तम दिग्दर्शन, जबरदस्त आणि रोमँटिक टच असलेल्या संगीताची जादू या सगळ्या गोष्टी चित्रपटात आहेत. हा चित्रपट कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीला जोडणारा धागा आहे. कारण यांत निर्माते ते अगदी कलाकार हे कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीतील दिग्गज आहेत.
ट्रेलरनंतर येत्या २८ नोव्हेंबरला हा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक सदागारा अभिनेता कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके यांच्यासह प्रसाद खांडेकर, अश्विनी चवरे, शलाका पवार, रुक्मिणी सुतार ही कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. ही कथा नक्षलवादी पार्श्वभूमीवर आधारित आहे. नक्षलवादी भागांत शूट केले आहे. मराठी गीतकार क्षितिज पटवर्धन आणि मंदार चोळकर गीतकार आहेत. तर गायक अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, रोहित राऊत, आनंदी जोशी, आर्या आंबेकर, अभय जोधपुरकर हे आहेत.
कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे. तर या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा दिपक पांडुरंग राणे, विजयकुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी सांभाळली असून ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत निर्मिती केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar