ठाण्याच्या क्रिकेटच्या ‘विकासा'साठी एमसीए सर्वोतोपरी सहाय्य करणार  - अजिंक्य नाईक
ठाणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। भविष्यात ठाणे हे देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू घडवणारी फॅक्टरी ठरणार आहे. त्या कामात जी काही मदत स्पोर्टिंग क्लब कमिटीला लागेल ती एमसीएकडून दिली जाईल, असे ठोस आश्वासन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक
अजिंक्य नाईक


ठाणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। भविष्यात ठाणे हे देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू घडवणारी फॅक्टरी ठरणार आहे. त्या कामात जी काही मदत स्पोर्टिंग क्लब कमिटीला लागेल ती एमसीएकडून दिली जाईल, असे ठोस आश्वासन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिलं.

स्पोर्टींग क्लब कमिटीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ड्रेसिंग रूम, इनडोअर क्रिकेट अॅकॅडमीचे उद्घाटन आणि १४ वर्षांखालील शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण अजिंक्य नाईक आणि विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी अजिंक्य नाईक बोलत होते.

एमसीए सचिव डॉ. उन्मेश खानविलकर, कार्यकारिणी सदस्य विघ्नेश कदम, संदिप विचारे, प्रमोद यादव, भरत किणी, कौशिक गोडबोले माजी सचिव अभय हडप, स्पोर्टींग क्लब कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी, खजिनदार जितेंद्र मेहता, सहसचिव श्रवण तावडे, सहसचिव सतीश नाचणे श्रीधर मांडले, संतोष जगताप, मनिष बंगेरा, सुनिल कुलकर्णी, अझीम खान, कार्यकारिणी सदस्य प्रशांत गावंड, अतुल फणसे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी स्पोर्टींग क्लब कमिटीचे सेक्रेटरी आणि एमसीए कार्यकारिणी सदस्य विकास रेपाळे यांच्या नेतृत्वाखाली स्पोर्टींग क्लबच्या सुरु असलेल्या ‘विकासा'च्या गतीचे अजिंक्य नाईक यांनी आपल्या भाषणात कौतुक केले. अजिंक्य नाईक म्हणाले, आमच्या मागील कमिटीने एमसीएमध्ये ३ वर्षांत ३० वर्षांचे काम केले आहे. विकास रेपाळे यांच्या नेतृत्वाखालील स्पोर्टींग क्लबची नवीन कमिटीही विकासाची गती पकडत आहे. क्रिकेटर घडविण्याचे काम मैदान क्लब करत असतात. त्याचसाठी पायाभूत सुविधांसाठी लागणारी सगळी मदत एमसीए देण्यासाठी तयार आहे. गेल्या अनेक वर्षांत ठाण्यातून क्रिकेटर घडत आहेत. मागील सहा वर्षात ठाण्यातील क्रिकेटला चांगला रंग येत आहे. येणाऱ्या काळात ठाणे हे क्रिकेटर घडविण्याची फॅक्ट्री होणार असल्याचे अजिंक्य नाईक म्हणाले.

आपल्या पालकांचा, कोचचा नेहमी आदर करा. हे डिजीटल युग असले तरी मोबाईल, प्ले स्टेशन, आयपॅड, सोशल मिडिया पासून लांब राहून खेळाच्या मैदानात आपला वेळ घालविण्याचा सल्ला अजिंक्य नाईक यांनी उपस्थित दिला.

स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित १४ वर्षांखालील शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेत सलग तीन वर्ष युनियन क्रिकेट अॅकॅडमीने विजेतेपद मिळाले आहे. तर युनायटेड क्रिकेट कल्ब असोसिएशन उपविजेता संघ ठरला आहे. उपस्थित मान्यवारांच्या हस्ते विजयी, उपविजयी संघांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

आश्वासनाची वचनपूर्ती - विकास रेपाळे

स्पोर्टींग क्लब कमिटीच्या निवडणुकीत एका महिन्यात अद्ययावत ड्रेसिंग रूम, इनडोअर क्रिकेट अॅकॅडमी उभारण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. विरोधकांनी आरोपांची राळ उठवली होती. मात्र आज एक महिन्याच्या आत आम्ही आमचे वचन पूर्ण केल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे यावेळी विकास रेपाळे म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande