भारतीय दृष्टिहीन महिला संघ टी-२० विश्वचषक विजेता
कोलंबो, २३ नोव्हेंबर (हिं.स.) भारतीय दृष्टिहीन महिला क्रिकेट संघाने पहिल्या महिला टी-२० क्रिकेट विश्वचषकावर आपले नाव कोरले. रविवारी श्रीलंकेतील कोलंबो येथील पी. सारा ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नेपाळने २० षटकांत ५ विकेट्स गमावून ११४
भारतीय दृष्टिहीन महिला संघ टी-२० विश्वचषक विजेता


कोलंबो, २३ नोव्हेंबर (हिं.स.) भारतीय दृष्टिहीन महिला क्रिकेट संघाने पहिल्या महिला टी-२० क्रिकेट विश्वचषकावर आपले नाव कोरले. रविवारी श्रीलंकेतील कोलंबो येथील पी. सारा ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नेपाळने २० षटकांत ५ विकेट्स गमावून ११४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाने १२.१ षटकांत ३ विकेट्स गमावून ११७ धावा केल्या आणि सहज विजय मिळवला.

विजेतेपदाच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नेपाळने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ विकेट्स गमावून ११४ धावा केल्या. संघाकडून सरिता घिमिरेने सर्वाधिक ३५ धावा केल्या, तर बिमला रायने २६ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला नाही.

भारताकडून जमुना राणी टुडू आणि अनु कुमारी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उर्वरित तीन फलंदाज धावचीत झाले.

११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार दीपिका टीसी ६ धावा करून लवकर बाद झाली आणि अनेखा देवी २ धावा करून बाद झाली. यानंतर करुणाने २७ चेंडूत ४२ धावा, फुला सरीनने २७ चेंडूत नाबाद ४४ धावा आणि बसंती हंसदाने नाबाद १३ धावा करून १२.१ षटकांत संघाला विजय मिळवून दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande