लक्ष्य सेनने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तनाकाला पराभूत करत हंगामातील पहिले विजेतेपद पटकावले
कॅनबेरा, 23 नोव्हेंबर (हिं.स.) भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत जपानच्या युशी तनाकाला पराभूत करून हंगामातील पहिले विजेतेपद पटकावले. पॅरिस ऑलिंपिकमध्ये चौथे स्थान मिळवल्यापासू
लक्ष्य सेन


कॅनबेरा, 23 नोव्हेंबर (हिं.स.) भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत जपानच्या युशी तनाकाला पराभूत करून हंगामातील पहिले विजेतेपद पटकावले. पॅरिस ऑलिंपिकमध्ये चौथे स्थान मिळवल्यापासून कठीण परिस्थितीतून जात असलेल्या २४ वर्षीय खेळाडूने २६ वर्षीय तनाकाला ३८ मिनिटांत २१-१५, २१-११ असे पराभूत करून शानदार कामगिरी केली.

जागतिक अजिंक्यपद २०२१ चा कांस्यपदक विजेता लक्ष्यने शेवटचा सुपर ३०० विजेता २०२४ मध्ये लखनौ येथे सय्यद मोदी इंटरनॅशनलमध्ये सुपर ३०० विजेता ठरला होता. या वर्षी सप्टेंबरमध्ये तो हाँगकाँग सुपर ५०० मध्ये उपविजेता ठरला होता.

यावर्षी ऑर्लीयन्स मास्टर्स सुपर ३०० विजेतेपद जिंकणाऱ्या जागतिक क्रमवारीत २६ व्या स्थानावर असलेल्या तनाकाविरुद्ध, लक्ष्यने उत्कृष्ट नियंत्रण आणि गतिमान खेळाचे प्रदर्शन केले आणि एकही गेम न गमावता सामना जिंकला.

या विजयासह, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा विद्यमान विजेता लक्ष्य या हंगामात BWF वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकणारा दुसरा भारतीय ठरला. आयुष शेट्टीने यापूर्वी यूएस ओपन सुपर ३०० स्पर्धा जिंकली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande