ओप्पो ए६एक्स लवकरच भारतात
मुंबई, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। ओप्पोने मे 2025 मध्ये लाँच केलेल्या ओप्पो ए5एक्स ने बजेट स्मार्टफोन बाजारात धडाकेबाज कामगिरी केली होती. आता त्याचाच उत्तराधिकारी असलेला ओप्पो ए६एक्स लवकरच भारतात दाखल होणार असल्याची एक्स वर शेअर केलेल्या एका प्रमोशनल
Oppo A6X


मुंबई, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। ओप्पोने मे 2025 मध्ये लाँच केलेल्या ओप्पो ए5एक्स ने बजेट स्मार्टफोन बाजारात धडाकेबाज कामगिरी केली होती. आता त्याचाच उत्तराधिकारी असलेला ओप्पो ए६एक्स लवकरच भारतात दाखल होणार असल्याची एक्स वर शेअर केलेल्या एका प्रमोशनल इमेजमधून स्पष्ट झालं आहे. या लीक इमेजमध्ये फोनचं डिझाइन आणि काही प्रमुख फीचर्स समोर आले आहेत. ओप्पो ए६एक्स लवकरच भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे.

ओप्पो ए६एक्स मध्ये 6500mAh क्षमतेची भलीमोठी बॅटरी दिली जाणार असून ए5एक्सच्या तुलनेत 500mAh वाढ करण्यात आली आहे. कंपनीने याला “सेगमेंटमधील सर्वात मोठी बॅटरी” असे मार्केटिंग करण्यास सुरूवात केल्याचेही संकेत आहेत. चार्जिंग स्पीड मात्र ए5एक्स प्रमाणेच 45W राहील. बजेट सेगमेंटमध्ये एवढी मोठी बॅटरी देणारा हा पहिलाच फोन ठरू शकतो.

डिझाइनकडे पाहिल्यास मोठे बदल दिसून येतात. याआधीच्या गोलाकार कॅमेरा डिझाइनऐवजी ओप्पो ए६एक्स मध्ये व्हर्टिकल पिल-शेप कॅमेरा मॉड्यूल असेल. त्यात 32 मेगापिक्सेलचा एकच रियर कॅमेरा आणि LED फ्लॅश मिळण्याची शक्यता आहे. फोन दोन आकर्षक निळा आणि काळा रंग पर्यायांसह येईल.

सध्याच्या ओप्पो ए5एक्स च्या स्पेसिफिकेशन्सनुसार ए६एक्स मध्ये 6.67 इंच HD+ LCD डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 1000 निट्स पीक ब्राइटनेस, मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट आणि MIL-STD-810H सर्टिफाइड मजबूत बिल्ड अशी वैशिष्ट्ये कायम ठेवली जाण्याची शक्यता आहे. IP65 डस्ट व वॉटर रेझिस्टन्स आणि 5 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा हे फीचर्सही मिळू शकतात.

किंमतीबाबत बोलायचं झाल्यास, ओप्पो ए5एक्सची सुरुवातीची किंमत भारतात 13,999 रुपये होती. त्यामुळे ओप्पो ए६एक्स हा देखील 15,000 रुपयांच्या आतच उपलब्ध होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बजेट सेगमेंटमध्ये रिअलमी, रेडमी आणि सॅमसंग यांना चांगलीच टक्कर देण्यासाठी ओप्पो सज्ज झालं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande