पंकजा मुंडेंच्या पीएच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या
* नवऱ्याचे अनैतिक संबंध, भांडणं, टॉर्चरमुळे होत्या तणावात * आरोपीस अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, कुटुंबियांची भूमिका मुंबई, २३ नोव्हेंबर (हिं.स.) : भाजपाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी डॉ.
पंकजा मुंडे पीए अनंत गर्जे पत्नी गौरी


अनंत गर्जे पत्नी गौरी


* नवऱ्याचे अनैतिक संबंध, भांडणं, टॉर्चरमुळे होत्या तणावात

* आरोपीस अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, कुटुंबियांची भूमिका

मुंबई, २३ नोव्हेंबर (हिं.स.) : भाजपाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी गर्जे यांनी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान वरळी पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असून अद्याप अनंत गर्जे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

प्राथमिक माहिती अशी की, अनंत गर्जे यांचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते. यामुळे अनंत आणि गौरी गर्जे यांच्यात अनेकदा भांडणं व्हायची. या सगळ्यामुळे केईएम रुग्णालयातील दंतवैद्यक विभागात डॉक्टर असलेल्या गौरी गर्जे प्रचंड तणावात होत्या. याच तणावातून गौरी यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

या सगळ्या प्रकारानंतर गौरी गर्जे यांच्या मामांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन महिन्यांपासून गौरी आणि तिच्या नवऱ्याचा वाद सुरू होता. गौरीला आपल्या नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. मात्र, तिने त्याला माफ केले होते. तरीही अनंत गर्जे यांनी त्या महिलेशी चॅटिंग सुरू ठेवले होते. दुसरीकडे अनंत गर्जे गौरीला खूप टॉर्चर करत होता. यावरुन दोघांमध्ये भांडण झाले तेव्हा, अनंत गर्जे यांनी स्वत:च्या हातावर वार केले आणि म्हणाला, मी पण मरेन आणि तुला पण गुंतवेन. गौरी डॉक्टर होती, लढाऊ मुलगी होती, ती कधीच आत्महत्या करणार नाही, असे गौरी गर्जे पालवे यांच्या मामांनी सांगितले.

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचा विवाह झाला होता. त्यावेळी गौरीच्या घरच्यांनी लग्नासाठी 50 ते 60 लाख रुपये खर्च केला होता. बीडमध्ये हे लग्न झाले होते. त्यावेळी मंत्री पंकजा मुंडेही या लग्नाला आल्या होत्या. लग्नानंतर गौरी यांना नवऱ्याच्या अनैतिक संबंधांविषयी समजले. तिने ही गोष्ट घरच्यांना सांगितली. पण नातेवाईकांना काय म्हणायचं, असं सांगत गौरी यांच्या आई-वडिलांनी पुढे काही करण्यात टाळाटाळ केली. गौरीच्या वडिलांकडे अनंत गर्जे यांच्या आणि दुसर्‍या महिलेल्या चॅटिंगचे पुरावे आहेत. गौरीने गळफास घेतला, माझ्यासमोर आत्महत्या केली, असे अनंत गर्जे यांनी पोलिसांना सांगितले. मग त्यांनी तिला आत्महत्या करताना थांबवले नाही का? गौरीने आत्महत्या केली तर मग अनंत गर्जे का पळाले, असा सवालही गौरी पालवे हिच्या मामांनी उपस्थित केला.

दरम्यान ही आत्महत्या नसून हत्या आहे असा थेट आरोप गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांनी केला असून याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कुटुंबीय दाखल झाले आहेत. जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिकाही कुटुंबियांनी घेतली आहे.

गौरी गर्जे या डॉक्टर असून त्यांनी सायन रुग्णालयात प्रॅक्टिस केली होती, त्या सध्या केईएम रुग्णालयात कार्यरत होत्या. अनंत गर्जे यांचे पहिले लग्न झाले होते, मात्र याबद्दल गौरी गर्जे यांना माहिती नव्हती. काही दिवसांपूर्वीच गौरी यांना याबद्दल समजले, तेव्हापासून त्या तणावात होत्या, त्या घटस्फोट घेण्याच्या तयारीत होत्या, मात्र त्याआधीच त्यांनी स्वत:ला संपवले.

दरम्यान, अनंत गर्जे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो, घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते, घाबरून ३१ व्या मजल्यावरून खिडकीतून उतरून मी ३० व्या मजल्यावरच्या माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतल्या अवस्थेत होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande