पोको टॅब्लेट सिरीज 26 नोव्हेंबरला होणार लॉंच
मुंबई, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। पोको कंपनी येत्या आठवड्यात जागतिक बाजारपेठेत आपला पहिला टॅब्लेट ‘पोको पॅड एक्स 1’ आणि ‘पोको पॅड एम 1’ सादर करणार आहे. कंपनीनं या लॉंच कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली असून हा कार्यक्रम 26 नोव्हेंबर रोजी बाली येथे दुपारी
Poco Pad series


Poco Pad X1


Poco Pad M1


मुंबई, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। पोको कंपनी येत्या आठवड्यात जागतिक बाजारपेठेत आपला पहिला टॅब्लेट ‘पोको पॅड एक्स 1’ आणि ‘पोको पॅड एम 1’ सादर करणार आहे. कंपनीनं या लॉंच कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली असून हा कार्यक्रम 26 नोव्हेंबर रोजी बाली येथे दुपारी 4 वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता) होणार आहे. याच मंचावर पोकोचे नवे फ्लॅगशिप स्मार्टफोन पोको एफ८ अल्ट्रा आणि पोको एफ८ प्रो यांचीही घोषणा केली जाईल.

पोको पॅड एम1 मध्ये 12,000 एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी दिली जात असून 12.1 इंचाचा 2.5K रिझॉल्यूशन डिस्प्ले 120 हर्ट्झपर्यंत रिफ्रेश रेटसह उपलब्ध असेल. किमान निळ्या रंगात हा टॅब्लेट बाजारात येणार आहे. मागील बाजूस पिल-आकाराच्या मॉड्यूलमध्ये एकच कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश दिलेला असेल. समोरील आणि मागील दोन्ही कॅमेरे 8 मेगापिक्सेलचे असतील.

ऑनलाइन लीक झालेल्या माहितीनुसार, या टॅब्लेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7S जेन 3 प्रोसेसर, LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 स्टोरेज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत सुमारे 349 युरो म्हणजेच अंदाजे 36,000 रुपये असू शकते. हा टॅब्लेट अँड्रॉइड 15 आधारित हायपरओएस 2 वर चालणार आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.4 आणि यूएसबी 2.0 पोर्ट उपलब्‍ध असेल. IP54 रेटिंगसह डस्ट व स्प्लॅश रेझिस्टन्स आणि 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्टही मिळेल.

मे 2024 मध्ये पोकोनं पहिला ‘पोको पॅड’ (रेडमी पॅड प्रोचा रिब्रँडेड व्हर्जन) लॉंच केला होता. मात्र पोको पॅड एम1 आणि पोको पॅड एक्स1 हे पूर्णपणे कंपनीनं स्वतः डिझाइन केलेले टॅब्लेट असणार आहेत. मिड-रेंज सेगमेंटमध्ये हे मॉडेल्स सॅमसंग, लेनोवो आणि शाओमीच्या टॅब्लेटना टक्कर देतील, असा प्रयत्न करणार आहेत. भारतातही हे मॉडेल्स लवकरच उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सुमारे 36,000 रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मोठी बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 7 सिरीज चिपसेट ही वैशिष्ट्ये पाहता, हा टॅब्लेट मीडिया कन्झम्प्शन, ऑनलाइन क्लासेस आणि लाइट गेमिंगसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande