
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर (हिं.स.) -
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘गुरु तेग बहादुर जी यांच्या हौतात्म्य दिना’च्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात म्हटलं आहे:
“गुरु तेग बहादुर जी यांच्या 350 व्या हौतात्म्य दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते.
गुरु तेग बहादुर जी यांनी धर्म, मानवता आणि सत्य यांचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांचं शौर्य, बलिदान आणि त्यांची निःस्वार्थ सेवा या गोष्टी सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांची शिकवण आपल्याला न्यायाच्या मार्गावर दृढतेने आणि धैर्याने पुढे जाण्याची प्रेरणा देते.
चला, आपण त्यांच्या मूल्यांना आपल्या जीवनात आचरण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या देशातील ऐक्य आणि सौहार्द अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करू.”
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी