
सांगली, 23 नोव्हेंबर (हिं.स.) स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. भारतीय महिला संघाच्या उपकर्णधाराचे व्यवस्थापक यांनी रविवारी याची माहिती दिली. मानधनाचे व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांनी माध्यमांना सांगितले की, आज सकाळी, स्मृतीचे वडील नाश्ता करत असताना, त्यांना अस्वस्थ वाटू लागले. आम्ही त्याच्या बरे होण्याची काही वेळ वाट पाहिली. आम्ही कोणताही धोका पत्करला नाही आणि ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली आणि त्याला रुग्णालयात नेले. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. मानधना तिच्या वडिलांच्या खूप जवळ आहे, म्हणून तिने आजचे लग्न ते बरे होईपर्यंत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
मानधनाच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल तुहिन म्हणाले, ते सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातच राहावे लागेल असे सांगितले आहे. आम्हा सर्वांना धक्का बसला आहे आम्ही सर्वजण त्यांच्या लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देतो. मानधनाने स्पष्टपणे सांगीतले आहे की, ती प्रथम तिच्या वडिलांना बरे होताना पाहेल आणि नंतर विवाग करणार आहे. लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
डॉक्टरांनी सांगितले आहे की, इको केल्यानंतर कोणतीही समस्या आढळली नाही. पण त्यांना निरीक्षणाखाली ठेवावे लागेल आणि गरज पडल्यास अँजिओग्राफी देखील करावी लागेल. डॉक्टर नमन शाह म्हणाले, श्रीनिवास मानधना हे स्मृती मानधना यांचे वडील आहेत. सकाळी त्यांच्या छातीच्या डाव्या बाजूला वेदना जाणवल्या. त्यांना हृदयविकाराची लक्षणे दिसली. त्यांना ताबडतोब सांगलीतील सर्वहित रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना सतत निरीक्षणाखाली ठेवणे आवश्यक आहे. आमचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रोहन ठाणेदार यांनी त्यांची तपासणी केली आहे. त्यांच्या इकोमध्ये काहीही नवीन आढळले नाही. पण त्यांना सतत निरीक्षणाखाली ठेवावे लागेल. गरज पडल्यास अँजिओग्राफी देखील करावी लागू शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे