
ढाका, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।बांग्लादेशमध्ये शुक्रवारी सकाळी आलेल्या 5.7 तीव्रतेच्या भूकंपात मृतांची संख्या 10 झाली आहे. शनिवारी संध्याकाळी ढाका आणि आसपासच्या जिल्यांमध्ये आणखी दोन सलग धक्के जाणवले. गेल्या 32 तासांत आलेल्या एकूण तीन धक्क्यांनी लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. तज्ज्ञांनी या सर्व धक्क्यांना एका मोठ्या भूकंपाचे संकेत म्हणून पाहिले आहे.
शुक्रवारी सकाळी बांग्लादेशमध्ये 5.7 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचा प्रभाव राजधानी ढाका सहित अनेक भागांत जाणवला. या दरम्यान 10 लोकांचा जीव गेला. या घटनेला 24 तासही झाले नव्हते की शनिवारी सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर शनिवारी संध्याकाळपर्यंत सलग दोन वेळा भूकंप झाल्याने लोक दहशतीत आले.
बांग्लादेश हवामान विभाग (बीएमडी) च्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र ढाका येथील बड्डा भागात जमिनीखाली नोंदवले गेले, ज्याची तीव्रता 3.7 होती. हा अतिशय दाट वस्तीचा परिसर आहे. तर 4.3 तीव्रतेच्या दुसऱ्या धक्क्याचे केंद्र बड्ड्याला लागून असलेल्या नरसिंगदी येथे जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होते.भूकंपाच्या धक्क्यांमुळे बांग्लादेशमधील अनेक इमारतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. हे धक्के सुमारे 25 सेकंदांपर्यंत जाणवत होते. बीएमडीचे प्रवक्ते तारिफूल नवाज कबीर यांच्या मते, भूकंपाची तीव्रता कमी असली तरी ते दीर्घकाळ जाणवत राहिले.
बांग्लादेश टेक्टॉनिक प्लेट्सच्या संगमावर स्थित असल्याने तज्ज्ञ येथे मोठ्या भूकंपाची शक्यता अनेक वर्षांपासून व्यक्त करत आहेत. विशेषतः ढाका हा भूकंपाच्या दृष्टिने जगातील 20 अतिसंवेदनशील शहरांपैकी एक मानला जातो. तेथे जर्जर इमारती आणि प्रचंड लोकसंख्या यांमुळे मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते.
बांग्लादेशावर भूकंपाचे संकट प्रथमच आलेले नाही. याआधी 1869 आणि 1930 मध्ये, जेव्हा हा प्रदेश भारताचा भाग होता, तेव्हा 7.0 तीव्रतेचे विनाशकारी भूकंप झाले होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode