अकोला येथे कौटुंबिक वादातून महिलेची हत्या
अकोला, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। शहरातील अकोट फाईल परिसरात आज सकाळी वैवाहिक वादातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर चाकूने वार केल्याची भीषण घटना घडली असून उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरो
प


अकोला, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। शहरातील अकोट फाईल परिसरात आज सकाळी वैवाहिक वादातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर चाकूने वार केल्याची भीषण घटना घडली असून उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे.

राजु नगर, अकोट फाईल अकोला भागातील शेख राजु शेख निजाम (४१) व त्यांची पत्नी शेख शमीम (३६) यांच्यात फारकती संबंधाने न्यायालयीन वाद सुरु असून, दोघे एकत्रच राहत होते.सततच्या वादविवादांनंतर, आज दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता, पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत झालेल्या भांडणात आरोपीने घरातील धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले. अकोट फाईल पोलिसांनी आरोपी शेख राजु शेख निजाम (४१), रा. राजु नगर यास ताब्यात घेतले असून याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड, DB पथक आणि अकोट फाईल पोलीस स्टेशनचा स्टाफ पोहोचून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणाचा पुढील तपास अकोट फाईल पोलीस करीत आहेत.

--------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande