आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त
जळगाव, 24 नोव्हेंबर (हिं.स.)सोने आणि चांदी दरात चढ उतार कायम असून आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही दरात घसरण झाली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून अशातच आज सोन्यासह चांदीत घसरण झाल्यानं ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.गेल्या काही महि
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त


जळगाव, 24 नोव्हेंबर (हिं.स.)सोने आणि चांदी दरात चढ उतार कायम असून आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही दरात घसरण झाली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून अशातच आज सोन्यासह चांदीत घसरण झाल्यानं ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.गेल्या काही महिन्यांत सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे, ज्याने विक्रमी उच्चांक गाठला आहे. दरम्यान, दिवाळीपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत. गेल्या आठवड्यातही सोने, चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या होत्या दरम्यान आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी बाजार उघडल्यावर १०३० रूपयांची घट नोंदवली गेली. आणि सोने तीन टक्के जीएसटीसह एक लाख २६ हजार ६९० रूपयांपर्यंत खाली आले. तर चांदीत १०३० रूपयांची घट नोंदवली गेल्याने चांदी एक लाख ५९ हजार ६५० रूपयांपर्यंत खाली आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande