
जळगाव , 24 नोव्हेंबर (हिं.स.) | शहरातील साईगीता नगर परिसरात घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे एक लाख ९३ हजार १८३ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
घरमालक ओम गोपालसिंग चव्हाण (वय २८) घरी परतल्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त आढळले. कपाटातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घराची पूर्णपणे उचकापाचक करत विविध सोन्याचे दागिने चोरून नेले. घटनेची नोंद शनिपेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर