
अनेक भागांत एक्यूआय 400 च्या पुढे
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर वाढत असून हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीमध्ये पोहोचली आहे. अनेक ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) 400 च्या पुढे गेला आहे, जो आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानला जातो. वायु गुणवत्ता प्रारंभिक चेतावणी प्रणालीच्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत प्रदूषणात कोणतीही घट होण्याची शक्यता नाही, कारण वाऱ्याचा वेग कमी असल्याने प्रदूषक वातावरणातच स्थिर राहणार आहे.
राष्ट्रीय राजधानीला ‘विषारी हवेतून’ दिलासा मिळत नाहीये. दिल्लीवर स्मॉगची दाट परत पसरली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) मते, सोमवारी दिल्लीतील हवा गंभीर स्थितीच्या उंबरठ्यावर होती. सकाळी 7 वाजता दिल्लीचा सरासरी एक्यूआय 396 नोंदवला गेला. वायु गुणवत्ता प्रारंभिक चेतावनी प्रणालीच्या अनुसार, पुढील 3 दिवस म्हणजे बुधवारपर्यंत दिल्लीची हवा ‘अत्यंत खराब’ श्रेणीत राहण्याचा अंदाज आहे. राजधानीत वाढणाऱ्या प्रदूषणाच्या निषेधार्थ रविवारी लोकांनी इंडिया गेटवर मोठे आंदोलन केले.राजधानीतील बहुतेक मॉनिटरिंग केंद्रांमध्ये सोमवारी सकाळी 7 वाजता एक्यूआय 400 च्या पुढे नोंदवला गेला, जो गंभीर श्रेणी दर्शवतो. दिल्लीलगतच्या नोएडामध्ये परिस्थिती आणखी खराब असून येथे सकाळी 5 वाजता एक्यूआय 413 पर्यंत पोहोचला.ग्रेटर नोएडामध्ये एक्यूआय 399 नोंदवला गेला, जो ‘अत्यंत खराब’ श्रेणीत असून गंभीर स्तराच्या अगदी जवळ आहे. गाझियाबादमध्येही नागरिक विषारी हवेमुळे त्रस्त आहेत. वसुंधरा भागात एक्यूआय 432 नोंदला गेला आहे.
राजधानीतील एक्यूआय नोंदी
आनंद विहार : 441
अलीपुर : 412
बवाना :437
बुराडी : 432
चांदनी चौक : 389
द्वारका सेक्टर-आठ : 402
आयटीओ : 410
जहांगीरपुरी : 452 (गंभीर श्रेणी)
गाझीपूर : 441----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी