धर्मेंद्रजींचे निधन म्हणजे भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत - पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली , 24 नोव्हेंबर (हिं.स.)।“धर्मेंद्रजींचे निधन म्हणजे भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत आहे”, अश्या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धा
धर्मेंद्रजींचे निधन म्हणजे भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत- पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली , 24 नोव्हेंबर (हिं.स.)।“धर्मेंद्रजींचे निधन म्हणजे भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत आहे”, अश्या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एक्स वर पोस्टमध्ये लिहिले “धर्मेंद्रजींचे निधन म्हणजे भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत आहे. ते एक प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्त्व, अद्वितीय अभिनेते होते, ज्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेत आकर्षण आणि खोली आणली. त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांनी असंख्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. धर्मेंद्रजी त्यांच्या साधेपणा, नम्रता आणि आपुलकीसाठीही तितक्याच प्रमाणात प्रशंसनीय होते. या दुःखद क्षणी माझ्या भावना त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांसोबत आहेत. ओम् शांती.”

धर्मेंद्र यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवास जवळपास सहा दशके पसरलेला होता. त्यांना बॉलिवूडचा “ही-मॅन” म्हणून ओळखले जात असे. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात 1960 साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाने केली. यानंतर त्यांनी ‘शोला और शबनम’, ‘अनपढ़’, ‘बंदिनी’, ‘पूजा के फूल’, ‘हकीकत’, ‘फूल और पत्थर’, ‘अनुपमा’, ‘खामोशी’, ‘प्यार ही प्यार’, ‘तुम हसीन मैं जवां’, ‘सीता और गीता’, ‘यादों की बारात’, ‘शोले’ अशा अनेक अविस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले. 2012 साली भारत सरकारने त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मभूषण’ प्रदान केला. त्यांच्या योगदानामुळे त्यांची गणना भारतीय सिनेमातील सर्वात महान आणि प्रतिष्ठित अभिनेत्यांमध्ये केली जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande