प्रेयसीला स्वाट टीम संरक्षण दिल्याबद्दल एफबीआय प्रमुख सापडले अडचणीत
वॉशिंग्टन , 24 नोव्हेंबर (हिं.स.)।भारतीय मूळ असलेले अमेरिकेच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एफबीआय)चे प्रमुख काश पटेल आपल्या गायिका गर्लफ्रेंड अ‍ॅलेक्सिस विल्किन्स हिला हाय-प्रोफाइल स्वाट सुरक्षा पुरवल्यामुळे अडचणीत सापडले आहेत.आधीपासूनच विविध मु
प्रेयसीला स्वाट टीम संरक्षण दिल्याबद्दल एफबीआय प्रमुख काश पटेल सापडले अडचणीत


वॉशिंग्टन , 24 नोव्हेंबर (हिं.स.)।भारतीय मूळ असलेले अमेरिकेच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एफबीआय)चे प्रमुख काश पटेल आपल्या गायिका गर्लफ्रेंड अ‍ॅलेक्सिस विल्किन्स हिला हाय-प्रोफाइल स्वाट सुरक्षा पुरवल्यामुळे अडचणीत सापडले आहेत.आधीपासूनच विविध मुद्द्यांवर काँग्रेसच्या निशाण्यावर असलेल्या पटेल यांच्या या निर्णयाचीही आता चौकशी सुरू झाली आहे.

गर्लफ्रेंड अ‍ॅलेक्सिस विल्किन्स नॅशनल रायफल असोसिएशनच्या वार्षिक परिषदेत दोन स्वाट कमांडोंसोबत प्रवेश करताना दिसताच सर्वांचे लक्ष वेधले गेले. मात्र त्या कार्यक्रमात कोणताही धोका नसल्याचे आढळल्यावर दोन्ही सुरक्षा कर्मचारी तिथून निघून गेले. त्यानंतर पटेल यांनी टीमच्या कमांडरकडे तक्रार केली की त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही. स्वाट टीम ही अमेरिकेतील अत्यंत प्रशिक्षित युनिट असून एखाद्या इमारतीवर दहशतवाद्यांचा ताबा मिळाल्यास बंधकांना सोडवण्यात त्यांना विशेष कौशल्य आहे.

पटेल यांनी आपल्या कार्यकाळातील पहिल्या नऊ महिन्यांत करदात्यांच्या पैशातून उपलब्ध केलेल्या सरकारी संसाधनांचा ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर वापर केला, त्याबद्दल आता प्रशासनामध्येही प्रश्न उपस्थित होत आहेत. यात स्वतःसाठी आणि आपल्या मैत्रिणीसाठी अतिमात्रेत सुरक्षा वापरणेही अंतर्भूत आहे. त्यांनी काही वैयक्तिक मनोरंजनाच्या प्रवासांसाठीही सरकारी जेटचा उपयोग केल्याचे समोर आले आहे. यामध्ये विल्किन्सला कार्यक्रमांना किंवा संगीत सादरीकरणांना जाताना सरकारी सुरक्षा पुरवल्याची बाब विशेष चर्चेत आली आहे.

पटेल यांचे काही दक्षिणपंथी ऑनलाइन समर्थकही टीका करणाऱ्यांमध्ये सामील झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्पसाठी काम करणाऱ्या प्रभावशाली व्यक्ती ग्रेस चोंग यांनी एक्सवर लिहिले — “विल्किन्स या काशच्या पत्नी आहेत का?” स्टीव्ह बॅनन यांनीही सोशल प्लॅटफॉर्मवर एफबीआयच्या संसाधनांच्या गैरवापराबद्दल प्रश्न उपस्थित केले.

एफबीआयच्या सध्याच्या आणि माजी अधिकाऱ्यांनीही या संपूर्ण घटनेला “असामान्य” असे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की स्वाट टीमला व्हीआयपी सुरक्षा देण्याचे सखोल प्रशिक्षण दिलेले नसते; त्यांचा वापर फक्त पूरक सुरक्षा म्हणूनच केला जातो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande