अमरावती : चोरट्यांनी ४५ ग्रॅम सोने लुटले, तीन ठाण्यात गुन्हे नोंद
अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.)शनिवारी सायंकाळी केवळ २३ मिनीटांत तीन महिलांच्या गळ्यातील ४५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली. या तिन्ही घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोनसाखळी लुटारूंचा शोध सुरू केला आहे. तसेच एकाच रात्री
शहरात सोनसाखळी चोरट्यांचा कहर : ४५ ग्रॅम सोनं लुटलं, तीन ठाण्यात गुन्हे नोंद


अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.)शनिवारी सायंकाळी केवळ २३ मिनीटांत तीन महिलांच्या गळ्यातील ४५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली. या तिन्ही घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोनसाखळी लुटारूंचा शोध सुरू केला आहे. तसेच एकाच रात्री सलग तीन घटना घडल्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

बडनेरा जुनीवस्ती येथील दत्त कॉलनी येथे राहणाऱ्या शोभगुणवंतराव ठवकर (वय ६२) या शनिवारी (दि.२२) सायंकाळी नातीसह मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या. दर्शन करून पायी घरी जात असताना ६.३० वाजताच्या सुमारास मागून स्पोर्ट्स बाईकवर दोन युवक आले आणि महिलेच्या गळ्यातील ८ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पळून गेले. महिलेने आरडाओरड केली परंतु क्षणातच दोघेही दिसेनासे झाले. घटनेनंतर लगेच महिलेने बडनेरा ठाण्यात तक्रार दिली. यानंतर बाईकस्वार भरधाव अमरावतीच्या दिशेने निघून गेले. दरम्यान कृष्णापर्ण कॉलनी निवासी सीमा सुरेश मुरारका (वय ६२) या घरी पायी जात असता सायंकाळी ६.४० च्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले आणि भरधाव निघून गेले.याबाबत महिलेने राजापेठ पोलिसांना माहिती दिली तेव्हा लगेच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. त्यानंतर सायंकाळी ६.५३ वाजता मोतीनगर येथे-राहणाऱ्या प्रणाली आशीष कदम (वय ४०) या शंकर लॉन्ड्री येथून जात असतांना लुटारूंनी त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून भरधाव निघून गेले. महिलेने आरडाओरडा केली असता नागरिकांनी धाव घेतली, परंतु दोघेही दुचाकीने पसार झाले. त्यानंतर महिलेने फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दिली. या तिन्ही घटनेत पोलिसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल करून सोनसाखळी लुटारूंचा शोध सुरू केला आहे. तसेच तीन्ही घटनास्थळावरील व आसपासचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलीस कसून पाहणी करीत आहेत. मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती कुठलाच सुगावा लागलेला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande