रायगड - तीन लाखांचा माल परत मिळवला; प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांची टीम पुनः चमकली
रायगड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। बोरले गावाजवळील ग्लोब फँटासिया बांधकाम साईटवरून लोखंडी रॉड आणि सिमेंटच्या गोण्या चोरीला जाण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता नेरळ पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत हा गुन्हा उघड करत चार आरोपींना जेरबंद करण्यात मोठे यश मिळ
३ लाखांचा माल परत मिळवला; प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांची टीम पुनः चमकली


रायगड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।

बोरले गावाजवळील ग्लोब फँटासिया बांधकाम साईटवरून लोखंडी रॉड आणि सिमेंटच्या गोण्या चोरीला जाण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता नेरळ पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत हा गुन्हा उघड करत चार आरोपींना जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. प्रभारी अधिकारी श्री. शिवाजी ढवळे यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही धडक कारवाई करून पुन्हा एकदा नेरळ पोलिसांची कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

ग्लोब फँटासिया साईटवरून मोठ्या प्रमाणात लोखंडी रॉड व सिमेंटच्या पिशव्या चोरीस गेल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात गु.र. नं. 207/2025 अंतर्गत नोंद झाली होती. घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही बंद अवस्थेत असल्याने सुरुवातीला तपासाला आव्हान निर्माण झाले. मात्र, ढवळे यांच्या सूक्ष्म मार्गदर्शनाखाली पथकातील पोह/2384 वाघमारे, पोशी/1836 केकाण, पोशी/467 बेंद्रे आणि पोशी/1415 वांगणेकर यांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला.

सखोल चौकशीत राकेश पारधी (30), तबारक हुसैन खान (34), रवींद्र कांबळे (28) आणि अतिश चहाड (33) यांनीच चोरी केल्याचे उघड झाले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तपासात पोलिसांनी 30,000 रुपयांचे लोखंडी रॉड, 1,03,600 रुपये किमतीच्या 370 सिमेंटच्या गोण्या तसेच चोरीसाठी वापरलेला महिंद्रा पिकअप असा एकूण सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत पोलिस अधीक्षक रायगड आंचल दलाल, अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवतारे व DYSP राहुल गायकवाड यांचे स्वतंत्र मार्गदर्शन लाभले. मात्र, संपूर्ण कारवाईचे नेतृत्व करून गुन्हा उघडकीस आणणारे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पुन्हा एकदा नेरळ पोलिसांची भक्कम छाप जनतेसमोर उमटवली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande