

मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। मोटोरोलानं अखेर भारतीय ग्राहकांसाठी आपला सर्वात अपेक्षित स्मार्टफोन मोटो G57 पॉवर 5G भारतात लॉंच केला आहे. 5 नोव्हेंबर 2025 रोजी जागतिक स्तरावर पदार्पण केल्यानंतर आता हा दमदार फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. 13,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या या स्मार्टफोननं बजेट सेगमेंटमध्येच प्रचंड स्पर्धा निर्माण केली आहे. 7000mAh ची महाकाय बॅटरी, सोनी LYT-600 कॅमेरा सेन्सर, स्नॅपड्रॅगन 6s Gen 4 प्रोसेसर आणि IP64 रेटिंग यांसारखे प्रीमियम फीचर्स देत मोटोरोलाने मध्यमवर्गीय स्मार्टफोन वापरकर्त्यांना आजून एक पर्याय दिला आहे.
मोटो G57 पॉवर 5G मध्ये 6.72 इंचाचा फुल एचडी+ IPS LCD डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेटमुळे गेमिंग आणि व्हिडीओ पाहताना अधिक स्मूथ अनुभव मिळतो. स्क्रीनवर Corning Gorilla Glass 7i प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. आकर्षक आणि प्रीमियम डिझाइनसोबतच व्हेगन लेदर फिनिशचा पर्यायही उपलब्ध आहे. IP64 धूळ आणि पाणी प्रतिकारसह मिलिटरी ग्रेड MIL-STD-810H सर्टिफिकेशन मिळाल्याने हा फोन टिकाऊपणातही उत्तम मानला जातो.
या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे 7000mAh क्षमतेची प्रचंड बॅटरी. कंपनीच्या मते, सामान्य वापरात हा फोन तब्बल चार दिवस बिनधास्त चालू शकतो. 30W फास्ट चार्जिंग सपोर्टमुळं एवढी मोठी बॅटरीही कमी वेळात पूर्ण चार्ज होते. सतत प्रवास करणारे, विद्यार्थी आणि भारी वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी हा फोन परफेक्ट पर्याय ठरणार आहे.
कॅमेराच्या बाबतीतही Moto G57 Power 5G दमदार आहे. मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 50MP सोनी LYTIA-600 मुख्य सेन्सरला OIS सपोर्ट मिळतो. त्यासोबत 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो/डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी पुढं 8MP कॅमेरा असून पोर्ट्रेट, नाईट मोड, प्रो मोडसारखे विविध फीचर्स My UX कॅमेरा सॉफ्टवेअरमुळे मिळतात.
Parformance विभागात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6s Gen 4 हा 4nm प्रोसेसर असून 8GB RAM (16GB पर्यंत व्हर्च्युअल बूस्ट) आणि 128GB किंवा 256GB स्टोरेजचे पर्याय देण्यात आले आहेत. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. अँड्रॉइड 16 वर आधारित My UX इंटरफेसमुळं जवळपास स्टॉक अँड्रॉइड सारखा स्वच्छ आणि जलद अनुभव मिळतो.
भारतामध्ये या फोनची सुरुवातीची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फ्लिपकार्टवर 3 डिसेंबरपासून सेल सुरू होणार असून ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन या तीन आकर्षक रंगांमध्ये फोन उपलब्ध होईल. लॉन्च ऑफर्स, एक्सचेंज आणि नो-कॉस्ट EMI चा लाभही ग्राहकांना मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule