पंतप्रधान मंगळवारी राम जन्मभूमी मंदिरात ध्वजारोहण समारंभाला राहणार उपस्थित
नवी दिल्ली, २४ नोव्हेंबर (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त ध्वजारोहण समारंभाला उपस्थित राहतील.पंतप्रधान मोदी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ते अयोध्येत पोहोचणार आहेत. यानंतर उत्तर प
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, २४ नोव्हेंबर (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त ध्वजारोहण समारंभाला उपस्थित राहतील.पंतप्रधान मोदी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ते अयोध्येत पोहोचणार आहेत. यानंतर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांचे स्वागत करतील. सकाळी १० वाजता पंतप्रधान सप्तमंदिराला भेट देणार आहेत. जिथे महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मिकी, देवी अहल्या, निषादराज गुहा आणि माता शबरी यांना समर्पित मंदिरे आहेत. त्यानंतर ते शेषावतार मंदिराला भेट देतील. सकाळी ११ वाजता पंतप्रधान माता अन्नपूर्णा मंदिराला भेट देतील. त्यानंतर ते राम दरबार गर्भगृहात दर्शन आणि पूजा करतील आणि त्यानंतर राम लल्ला गर्भगृहात दर्शन आणि पूजा करतील.

दुपारी १२ वाजता, पंतप्रधान अयोध्येतील पवित्र श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकावतील. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे आणि सांस्कृतिक उत्सव आणि राष्ट्रीय एकतेच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात म्हणून. देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिदृश्यात हा एक महत्त्वाचा प्रसंग असेल.पंतप्रधान या ऐतिहासिक प्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करतील.

हा कार्यक्रम मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या शुभ पंचमीला, श्री राम आणि माता सीतेच्या विवाह पंचमीच्या अभिजित मुहूर्ताच्या अनुषंगाने आयोजित केला जाणार आहे. जो दैवी मिलनाचे प्रतीक आहे. ही तारीख नववे शीख गुरु, गुरु तेग बहादूर यांचा शहीद दिन देखील आहे. ज्यांनी १७ व्या शतकात अयोध्येत ४८ तास विनाविराम ध्यान केले होते. ज्यामुळे या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढते.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्रानुसार, काटकोन त्रिकोणी ध्वज १० फूट उंच आणि २० फूट लांब आहे. त्यावर तेजस्वी सूर्याची प्रतिमा आहे, जी भगवान श्री रामांच्या तेज आणि शौर्याचे प्रतीक आहे. त्यावर 'ओम' शिलालेख आणि कोविदार वृक्षाचे चित्र आहे. पवित्र भगवा ध्वज रामराज्याच्या आदर्शांना प्रतिबिंबित करून प्रतिष्ठा, एकता आणि सांस्कृतिक सातत्य यांचा संदेश देईल.

पारंपारिक उत्तर भारतीय नागर स्थापत्य शैलीत बांधलेल्या शिखरावर हा ध्वज फडकवला जाईल. तर दक्षिण भारतीय स्थापत्य परंपरेत डिझाइन केलेले ८०० मीटर लांबीचे रामपर्ता, मंदिराभोवती एक प्रदक्षिणा वर्तुळ, मंदिराच्या स्थापत्य विविधतेचे प्रदर्शन करते.

मंदिर संकुलात मुख्य मंदिराच्या बाहेरील भिंतींवर वाल्मिकी रामायणावर आधारित भगवान श्री राम यांच्या जीवनातील ८७ दगडी दृश्ये कोरलेली आहेत आणि भिंतींवर भारतीय संस्कृतीतील ७९ कांस्य कथा कोरलेल्या आहेत. एकत्रितपणे, हे घटक सर्व अभ्यागतांना माहितीपूर्ण अनुभव देतात, ज्यामुळे भगवान श्री राम यांच्या जीवनाची आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाची सखोल माहिती मिळते.

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande