राजनाथ सिंह यांचे वक्तव्य आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे- पाक परराष्ट्र मंत्रालय
इस्लामाबाद, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या सिंध प्रांताबाबत दिलेल्या विधानानंतर पाकिस्तानात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करून या टिप्पणीची कडाडून निंदा
राजनाथ सिंह यांचे वक्तव्य आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे- पाक परराष्ट्र मंत्रालय


इस्लामाबाद, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या सिंध प्रांताबाबत दिलेल्या विधानानंतर पाकिस्तानात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करून या टिप्पणीची कडाडून निंदा केली आहे. मंत्रालयाचे म्हणणे आहे की राजनाथ सिंह यांचे वक्तव्य आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे आणि त्यातून हिंदू धर्माच्या विस्तारवादी विचारसरणीचे दर्शन होते.

परराष्ट्र मंत्रालयाने भारतावर टीका करताना म्हटले की भारत सरकारने आपल्या नागरिकांच्या—विशेषत: अल्पसंख्याक समुदायांच्या—सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पाकिस्तानने असा आरोपही केला की भारतात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसा भडकविणाऱ्यांना जबाबदार धरण्यात येत नाही.निवेदनात हेही नमूद केले गेले की भारताने ईशान्येकडील त्या लोकांच्या समस्या सोडवायला हव्यात, जे पद्धतशीर भेदभाव, उपेक्षा आणि ओळख-आधारित हिंसेचा सामना करत आहेत.

या विवादात पाकिस्तानने कश्मीर मुद्दाही जोडला. मंत्रालयाने म्हटले की भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांनुसार कश्मीर विवादाच्या समाधानासाठी पावले उचलली पाहिजेत. पाकिस्तानने दावा केला की तो आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारे भारताशी असलेले वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यास तयार आहे, पण आपल्या सुरक्षा आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

रविवारी दिल्लीतील सिंधी समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी सिंध आणि भारतातील सांस्कृतिक व सभ्यतामूलक नात्याचा उल्लेख केला.ते म्हणाले, “आज सिंधची भूमी भारताचा भाग नसली तरी सभ्यतेच्या दृष्टीने सिंध नेहमी भारताचाच भाग राहील. आणि भूमीच्या बाबतीत सीमा बदलू शकतात. कोण जाणे, उद्या सिंध पुन्हा भारतात सामील होऊ शकतो.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande