पाकिस्तानात संघीय पोलिस दलाच्या मुख्यालयावर आत्मघातकी हल्ला; दोन दहशतवाद्यांसह एकाचा मृत्यू
इस्लामाबाद, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या पेशावर शहरात सोमवारी (दि. २४) फेडरल कॉन्स्टेबुलरी (संघीय पोलिस दल)च्या मुख्यालयावर हल्ला झाला. अहवालांनुसार मुख्यालयाजवळ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले, ज्यानंतर संपूर्ण परिसर खाली करून लोकांना दूर हलवण्
पाकिस्तान एफसी मुख्यालयावर आत्मघातकी हल्ला; तीन दहशतवादी ठार


इस्लामाबाद, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या पेशावर शहरात सोमवारी (दि. २४) फेडरल कॉन्स्टेबुलरी (संघीय पोलिस दल)च्या मुख्यालयावर हल्ला झाला. अहवालांनुसार मुख्यालयाजवळ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले, ज्यानंतर संपूर्ण परिसर खाली करून लोकांना दूर हलवण्यात आले. या घटनेत किमान तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, पोलिस दलाच्या मुख्यालयावर हल्ले अद्याप सुरू आहेत आणि सुरक्षा दल प्रत्युत्तर देत आहेत. असे सांगितले जात आहे की, प्रथम एका आत्मघाती हल्लेखोराने मुख्यालयाच्या गेटवरच स्वतःला उडवून दिले. त्यानंतर काही काळ गोळीबाराचे आवाजही ऐकू आले. दुसरीकडे, या हल्ल्यात एकाच वेळी दोन आत्मघाती हल्लेखोर सहभागी होते. हि घटना मोटारसायकल स्टँडवर घडली.

सुरक्षा स्रोतांच्या माहितीनुसार, या घटनेत तीन दहशतवादी ठार करण्यात आले असून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.

ज्या संघीय कॉन्स्टेबुलरी दलावर हल्ला झाला आहे, ते एक नागरी निमलष्करी दल आहे, ज्याला पूर्वी फ्रंटियर कॉन्स्टेबुलरी म्हणून ओळखले जात होते. यावर्षी जुलै महिन्यात शहबाज शरीफ सरकारने याचे नाव बदलून फेडरल कॉन्स्टेबुलरी केले. पेशावरमध्ये ज्या ठिकाणी याचे मुख्यालय आहे, तो परिसर अत्यंत गर्दीचा आहे आणि सैन्य छावणीही जवळच आहे.

पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांत दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे, विशेषत: खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात. या हल्ल्यांच्या वाढीमागील प्रमुख कारण म्हणजे दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि पाकिस्तान सरकार यांच्यात झालेल्या शांतता कराराचे अपयश होय.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande