६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची सुरुवात
जळगाव, , 25 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी जळगांव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दि. २५ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. दिनांक २५ नोव्हेंबर ते ९ डिस
६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची सुरुवात


जळगाव, , 25 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी जळगांव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दि. २५ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. दिनांक २५ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरच्या दरम्यान रोज संध्याकाळी ७ वाजता एकूण १५ नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केले आहे.

या स्पर्धेमध्ये एकूण १५ संघांचा सहभाग असून यात दि. २५ नोव्हेंबरला भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन दीपनगर यांचे दानव, दि. २६ नोव्हेंबरला इंदाई फाऊंडेशनचे पालखी, दि. २७ नोव्हेंबरला खान्देश लोकरंग बहुउद्देशीय संस्था, नगरदेवळा, ता. पाचोरा यांचे जुगाड द गोळायुग, दि. २८ नोव्हेंबरला कै. अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान, जळगावचे येसूबाई, दि. २९ नोव्हेंबरला जननायक थिएटर्स, जळगावचे गुंता, दि. ३० नोव्हेंबरला नाट्यरंग बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांचे घर केलंय, दि. १ डिसेंबरला महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी पतसंस्था लि. दीपनगर यांचे तांडा ऊसतोडीचा, दि. २ डिसेंबरला नाट्यभारती इंदूर यांचे काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक, दि. ३ डिसेंबरला लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था, नाशिक विभाग, शाखा धुळे यांचे ऐश्वर्या ब्यूटी पार्लर, दि. ४ डिसेंबरला नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांचे मारुतीची जत्रा, दि. ५ डिसेंबरला रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव यांचे पुन्हा एकदा, दि. ६ डिसेंबरला समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे, ता. एरंडोल, जि. जळगाव यांचे झेंडा रोविला, दि. ७ डिसेंबरला सिध्दांत बहुउद्देशीय संस्था, धुळे यांचे बिफोर द ट्रेन लिव्हज्‌, दि. ८ डिसेंबरला स्व. यमुनाबाई बाबूराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था पिंपळगाव बु।।, ता. पाचोरा यांचे आवर्त, दि. ९ डिसेंबरला विश्वात्मा प्रतिष्ठान यांचे आगंतुक ही नाटके सादर करण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande