
मुंबई, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। 130 वर्षांहून अधिक काळ भारतातील सर्वात विश्वासार्ह वेलनेस ब्रँडपैकी एक असलेल्या अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडने कौन बनेगा करोडपतीसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती या शोचा 25वा सीझन ऑक्टोबर 26 पासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचे सह प्रायोजक म्हणून अमृतांजनने ही भागीदारी केली आहे.
या सहकार्याद्वारे, अमृतांजन केबीसीच्या प्रेक्षक वर्गाशी जोडले जाईल आणि त्यांच्यात एक मजबूत ब्रँड रिकॉल निर्माण होईल. बॉलीवूडचे शहेनशाह अशी ओळख असलेले अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत. आपल्या अनोख्या सूत्रसंचालनाने ते अनेक वेगवेगळ्या कथा, प्रसंगाला शोभेल असे निवेदन, आणि लोकांना भावनिकदृष्ट्या या कार्यक्रमात गुंतवून ठेवतात. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही हा कार्यक्रम लोकप्रिय आहे.
या भागीदारीबद्दल अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडचे मुख्य विपणन अधिकारी मणि भगवथीस्वरन म्हणाले: “132 वर्षांपासून अमृतांजन अनेक पिढ्यांच्या आरामाची काळजी करते आहे. त्यामुळेच आमच्यावर ग्राहकांचा पूर्ण विश्वास आहे. माहिती, ज्ञानाशी संबंधित असलेल्या केबीसी या कार्यक्रमासोबतची आमची भागीदारी म्हणजे विश्वासार्हता आणि ग्राहकांशी जोडलेले राहण्यासाठी आमचे ब्रँड तत्त्वज्ञान 'हर दर्द मिटाये' याचा नैसर्गिक विस्तार आहे.
ग्राहकांची काळजी घेण्याची 132 वर्षे अमृतांजन विश्वासाने साजरी करत असताना, कौन बनेगा करोडपती सोबतची त्यांची भागीदारी हा दैनंदिन जीवनातील एक विश्वासार्ह साथीदार असण्याच्या उद्देशाला पुन्हा एकदा समर्थन देतो. भारतीय कुटुंबांच्या रोजच्या जगण्यातील दैनंदिन वेदना आणि ताणतणावांना तोंड देण्यासाठी अमृतांजन पिढ्यानपिढ्या त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. प्रत्येक वेळी अमृतांजन वेदना कमी करते, आराम देते आणि चेहऱ्यावर हास्य फुलवते. वेदना किंवा ताण काहीही असो, आम्ही आमच्या ग्राहकांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना आराम देण्यासाठी तिथे उपलब्ध असू, हे आमचे ब्रँड तत्त्वज्ञान या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule