
ठाणे, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : आत्मनिर्भर गुंतवणूकदार तयार करण्यासाठी नवोन्मेषी उपायांना प्रोत्साहन देत केंद्रीय डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडने (सीडीएसएल) विद्यार्थ्यांसाठी पहिल्या ‘पुनर्कल्पना आयडीयाथॉन’ स्पर्धेची घोषणा केली आहे. गुंतवणूकदार शिक्षण, सहभाग आणि आर्थिक क्षेत्रातील समावेशन वाढवणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.
सीडीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहल व्होरा यांनी सांगितले की, तरुणांनी गेमिफिकेशन, तंत्रज्ञान, डिझाइन वा संवाद या माध्यमांतून गुंतवणूकदार जागरूकतेसाठी नव्या कल्पना मांडाव्यात. विद्यार्थ्यांच्या मौलिक कल्पनांमधून गुंतवणूकदार शिक्षणाला नवा आयाम मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या स्पर्धेत विजेत्यांसाठी 11.5 लाख रुपयांचे एकूण बक्षीस ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे चार सदस्यांचे संघ तसेच त्यांचे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. स्पर्धेची नोंदणी 17 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांकडून उत्साही प्रतिसाद मिळत आहे.अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी सीडीएसएलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी