सोलापूर : बार्शी तालुक्यात महिलेसह तीन अल्पवयीन मुलांची सुटका
सोलापूर, 25 नोव्हेंबर,(हिं.स.)। चुंब येथे अन्य राज्यातील एका महिलेसह तीन अल्पवयीन बालकांना मागील तीन वर्षापासून शेतातील राहत्या घरी वेठीस धरुन काम करुन घेतले. अन्न नाही, मोबदला नाही तसेच मुळगावी जाणेसाठी प्रयत्न केला असता जाऊ दिले नाही याप्रकरणी का
सोलापूर : बार्शी तालुक्यात महिलेसह तीन अल्पवयीन मुलांची सुटका


सोलापूर, 25 नोव्हेंबर,(हिं.स.)। चुंब येथे अन्य राज्यातील एका महिलेसह तीन अल्पवयीन बालकांना मागील तीन वर्षापासून शेतातील राहत्या घरी वेठीस धरुन काम करुन घेतले. अन्न नाही, मोबदला नाही तसेच मुळगावी जाणेसाठी प्रयत्न केला असता जाऊ दिले नाही याप्रकरणी कामगार अधिकाऱ्यांसह पोलिस, महसूल अधिकाऱ्यांनी छापा टाकून एका विरोधात बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

झाकीर हुसेन इलाही सय्यद(रा.खडकोणी रोड,चुंब(ता.बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे लिपिक गणेश महादेव भगरे(वय ३०,रा. अकोले मंद्रुप ता. दक्षिण सोलापुर जि.सोलापूर)यांनी फिर्याद दाखल केली ही घटना १ सप्टेंबर २०२२ ते २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडली.

झारखंड राज्याच्या कंट्रोल रुममधून ईमेलद्वारे एका व्यक्तीने उपायुक्त गढ़वा झारखंड कार्यालयास तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये पत्नीसह तीन अल्पवयीन मुलांचा छ्ळ होत आहे. त्यांची सोडवणूक व्हावी असे म्हटले होते त्यानुसार तक्रार प्राप्त होताच सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांचे आदेशाने माझेसह निलेश येलगुंडे,सोमनाथ शिंदे,बाळासाहेब ठाकुर बार्शी तालुका पोलिस ठाणेकडील पोलिस चौधरी,हवालदार पवार,मंडळ अधिकारी आगळगाव अतुल आलेवर, ग्राम महसुल अधिकारी चुंब अमृता सुरवसे,मंडळ सेवक शहाजी कोतमिरे यांनी घटनास्थळी पंचासमवेत छापा टाकला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande