
कोल्हापूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। संभापूर, ता हातकणंगले येथील बिरदेव मंदिराच्या मागील बाजूस भाड्याच्या घरात राहणाऱ्या दोन परप्रांतीय कामगारांमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार हाणामारी झाली. या मारहाणीत आरोपी देवा चंदन याने रागाच्या भरात मंगल मांझी वय 26 याच्यावर चाकूने हल्ला करून त्याला भोसकले त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री 10 वाजण्यासुमार घडली.
या हल्ल्यात मंगल मांझी वय 26 नावाचा परप्रांतीय तरुण मयत झाला. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्दी मिळताच देवा चंदन नावाच्या संशयीत आरोपीस पोलिसानी ताब्यात घेतले. या घटनेने परिसर हादरून गेला. हे दोघे संभापूर येथील एका खाजगी कंपनीत काम करत होते. सोमवारी सुट्टी असल्याने ते दुपारपासून गांजा व दारुच्या नशेत होते. त्यात या दोघांचा किरकोळ कारणावरुन वाद झाला. यातून जोरदार हाणामारी झाली. देवा चंदनने मंगल मांझी यास चाकूने भोकसले. त्या तो गंभीर जखमी झाला. ही घटना शेजारी राहणाऱ्या अन्य लोकानी पाहीली व त्यानी मांझी यास उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवले व शिरोली पोलिसाना याबाबत माहिती दिली. रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगल मांझी याचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस दाखल होऊन घटनेची पहाणी करत आरोपीस ताब्यात घेतले.
-------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar