बिहार : ट्रक आणि ऑटोरिक्षाची धडक होऊन अपघात; पाच जणांचा मृत्यू
पाटणा , 25 नोव्हेंबर (हिं.स.) बिहारमधील शेखपूरा येथे मंगळवारी (5 नोव्हेंबर) दुपारी एक भीषण रस्ते अपघात घडला. शेखपूरा पोलिस स्टेशन हद्दीतील एकसारी बिगहा जवळ ट्रक आणि ऑटोची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध
बिहारमधील शेखपुरा येथे ट्रक आणि ऑटोरिक्षाची धडक होऊन अपघात


पाटणा , 25 नोव्हेंबर (हिं.स.) बिहारमधील शेखपूरा येथे मंगळवारी (5 नोव्हेंबर) दुपारी एक भीषण रस्ते अपघात घडला. शेखपूरा पोलिस स्टेशन हद्दीतील एकसारी बिगहा जवळ ट्रक आणि ऑटोची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आई–मुलगाही समाविष्ट आहेत. हा अपघात होताच परिसरात गोंधळ माजला.

माहितीनुसार, मृतांमध्ये टुनटुन यादव यांच्या पत्नी आशा देवी (वय अंदाजे 55–56 वर्षे) आणि त्यांचा मुलगा राहुल (वय अंदाजे 22 वर्षे) यांचा समावेश आहे. हे दोघे काही कामानिमित्त पाटणा येथे जाणार होते. तिसऱ्या मृत व्यक्तीची ओळख राजकुमार साव अशी झाली आहे. याशिवाय महेंद्र मांझी यांच्या पत्नी अहिल्या देवी आणि 17 वर्षीय निशा कुमारी हिचाही मृत्यू झाला. निशाची बहीण प्रिया जखमी झाली असून तिच्यावर पावापुरी येथे उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि 7–8 जखमींना पावापुरी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहितीप्रमाणे, हे सर्व जण ऑटोमध्ये प्रवास करत होते. समोरून येणाऱ्या ट्रकने अचानक धडक दिल्यानंतर परिस्थिती भयावह झाली आणि ओरडाआक्रोश सुरू झाला.

स्थानिकांच्या मते, ऑटोमध्ये 12–13 जण बसले होते. अपघातानंतर ट्रक जप्त करण्यात आला आहे, तर ट्रक चालक पळून गेला आहे.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार रणधीर कुमार उर्फ सोनी घटनास्थळी पोहोचले. तसेच डीएसपीसह मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.अपघातावर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी एक्स वर लिहिले: “शेखपूरा येथील चेवाडा पोलिस स्टेशन हद्दीत ट्रक आणि ऑटोची धडक होऊन झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयविदारक आहे. दिवंगत आत्म्यांना ईश्वराच्या चरणी स्थान लाभो. माझ्या संवेदना पीडित कुटुंबांबरोबर आहेत. मी जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो आणि शोकाकुल परिवारांना या असह्य दुःखाचा सामना करण्याची शक्ती मिळो, अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. ॐ शांती!”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande