
मुंबई, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने द ग्लोबल सेंटर फॉर हेल्दी वर्कप्लेसेस आणि आरोग्य वर्ल्ड यांच्या भागीदारीत मुंबई मध्ये 20–21 नोव्हेंबर रोजी गोदरेज वन येथे आयोजित ग्लोबल समिट 2025 आणि 14 व्या वार्षिक हेल्दी वर्कप्लेस कॉन्फरन्सची यशस्वीरीत्या सांगता केली. “वर्कप्लेस हेल्थ 2030: स्वास्थ्य ते चैतन्यमय जीवनशक्तीद्वारे भविष्याची पुनर्व्याख्या” या संकल्पनेखालील या कार्यक्रमात पुढील दशकातील कामाचे ठिकाण अधिक स्वास्थ्यपूर्ण करण्यासाठी, त्याला योग्य आकार देण्यासाठी जगभरातील नेते, संशोधक आणि एचआर तज्ञ एकत्र आले होते.
गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे ग्रुप हेड अजय भट्ट म्हणाले, “गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपमध्ये आम्ही कर्मचारी कल्याणाला व्यवसाय टिकून राहण्याचा मुख्य आधार मानतो. कार्यस्थळे बदलत असताना, आरोग्य आणि सहानुभूती या गोष्टी संस्थात्मक संस्कृतीत समाविष्ट करणे हे पर्याय नसून अत्यावश्यक बनले आहे. या बैठकीच्या माध्यमातून सक्षम, लवचिक टीम्स तयार करणाऱ्या आणि कार्यस्थळ आरोग्यासाठी नवीन जागतिक मापदंड निर्माण करणाऱ्या कृतींना चालना देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
द ग्लोबल सेंटर फॉर हेल्दी वर्कप्लेसेसचे मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स डायरेक्टर बॅरी क्रिस्प म्हणाले, “वर्कप्लेस हेल्थ म्हणजेच कामाच्या ठिकाणचे स्वास्थ्य हे एका साध्या कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या फायद्यापासून व्यवसायाच्या सक्षमतेसाठी, चैतन्यासाठी एक धोरणात्मक आवश्यकतेपर्यंत विकसित झाले आहे. ‘वर्कप्लेस हेल्थ 2030’ या संकल्पनेखालील ही बैठक जगभरातील आवाजांना एकत्र आणते. त्यामुळे पारंपरिक स्वास्थ्यापासून पुढे जाऊन जीवनशक्ती, मानसिक आरोग्यातील समानता आणि ESG-linked मेट्रिक्स प्रत्येक संस्थेच्या डीएनए मध्ये रुजवले जातील. मुंबईतील गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप आणि आरोग्य वर्ल्ड सोबतचे आमचे सहकार्य हे ‘चांगले आरोग्य म्हणजे चांगला व्यवसाय’ या तत्वाचे शक्तिशाली उदाहरण आहे आणि कामकाजाचे भविष्य आरोग्य-प्रथम असे असले पाहिजे.”
आरोग्य वर्ल्ड मधील चीफ ऑफ प्रोग्राम्स श्रबानी बॅनर्जी म्हणाल्या, “या वर्षातील ग्लोबल समीट ही जागतिक संवाद, सहकार्य, नाविन्यपूर्णतेची देवाणघेवाण आणि उच्च-प्रभावी भागीदारी घडवण्यासाठी एक अत्यावश्यक व्यासपीठ ठरेल. जागतिक स्तरावरील आरोग्य धोरणाला नव्याने आकार देण्यासाठी ते आवश्यक आहे. या कार्यक्रमाला मोठे यश मिळवून देण्यासाठी आमचे धोरणात्मक भागीदार गोदरेज इंडस्ट्रीज आणि ग्लोबल सेंटर फॉर हेल्दी वर्कप्लेसेस यांच्या व्यापक सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो!”
मुख्य सत्रांमध्ये डॉ. रती गोदरेज यांनी “व्हेअर लीडरशिप, टेक्नॉलॉजी अँड एम्पथी मीट” या विषयावर भाषण केले. त्याचबरोबर टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्सचे अध्यक्ष बन्मली अग्रवाल आणि गोदरेज इंडस्ट्रीजचे सीएचआरओ सुमित मित्रा यांनीही महत्त्वपूर्ण विचार मांडले. “इकीगाई” चे लेखक हेक्टर गार्सिया यांनी आनंदाचे सांस्कृतिक घटक स्पष्ट केले. ओईसीडी, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर, ब्रिज हेल्थ, टाटा पॉवर, रिलायन्स इंडस्ट्रीज, फायझर, डीयू (युएई), आणि नुवोको व्हिस्टास कॉर्प. लिमिटेड येथील तज्ञांनी एआय-प्रणीत स्वास्थ्य, मानसिक आरोग्यातील नेतृत्व आणि ESG-linked मेट्रिक्स यावर चर्चा केली. पेत्रोब्रास, अलियान्झ, सॅनोफी, विप्रो आणि बायर कडूनही अतिरिक्त दृष्टिकोन मांडले गेले.
या बैठकी मध्ये माइंडफुलनेस कार्यशाळा, वैयक्तिकृत वेलनेस केअर स्टडीज, नेटवर्किंग, ग्लोबल हेल्दी वर्कप्लेस अवार्ड्सचे आयोजन आणि आरोग्य सिटी मुंबईची घोषणा करण्यात आली. 10 हून अधिक देशांतील 40 हून अधिक वक्त्यांच्या सहभागासह या बैठकीने अधिक स्वास्थ्यपूर्ण आणि भविष्याभिमुख कार्यस्थळे घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मंच म्हणून आपली भूमिका अधिक बळकट केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule