
या प्रकल्पातून अंदाजे 755 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल
मुंबई, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने नागपुरात सुमारे 75 एकर जमीन संपादित करून आर्थिक वर्ष 26साठी 20,000 रुपयांच्या त्यांच्या व्यवसाय विकासाच्या वार्षिक मार्गदर्शनाला मागे टाकल्याचे जाहीर केले.
शहराची मजबूत वेगवान गती आणि उदयोन्मुख विकास कॉरिडॉरवरील धोरणात्मक घडामोडी शहराचे महत्त्व अधोरेखित करतात. यामुळेच गेल्या चार वर्षांत शहरातील हे तिसरे संपादन आहे. या जमिनीवरील विकासात प्रामुख्याने प्लॉट केलेली निवासी युनिट्स असतील आणि अंदाजे 1.7 दशलक्ष चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र असेल.
नव्याने संपादित केलेली ही जमीन समृद्धी महामार्ग आणि मिहान सेझजवळ आहे. यासोबतच नागपूर-हैदराबाद महामार्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासह प्रमुख कॉरिडॉरसोबत अखंड कनेक्टिव्हिटी आहे. विकसित झालेल्या सामाजिक आणि महानगरपालिका यंत्रणेचा या जमिनीला फायदा होणार असून यामुळे दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा, शैक्षणिक संस्था, किरकोळ विक्री केंद्रे आणि मनोरंजन पर्याय उपलब्ध होतील. यामुळे ते भविष्यात राहण्यासाठी अत्यंत आकर्षक ठिकाण बनते.
गोदरेज प्रॉपर्टीजचे एमडी आणि सीईओ गौरव पांडे म्हणाले, “पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून नागपूर आपले स्थान मजबूत करत आहे. त्याची कनेक्टिव्हिटी देखील उत्तम असून आणि वाढत्या निवासी मागणीमुळे त्याला समर्थन मिळते आहे. भारतातील उदयोन्मुख रिअल इस्टेट मार्केटमध्ये उपस्थिती मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याने, हे संपादन विस्ताराच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचे पाऊल आहे. आमच्या विकसित होत असलेल्या आकांक्षांशी सुसंगत, रहिवाशांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारी दर्जेदार प्लॉटेड टाउनशिप विकसित करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule