इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा भारत दौरा रद्द
नवी दिल्ली , 25 नोव्हेंबर (हिं.स.)।इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या वर्षाच्या अखेरीस होणारा भारतीय दौरा पुन्हा एकदा पुढे ढकलला आहे. दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर निर्माण झालेल्या सुरक्षाविषयक चिंतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

माहितीनुसार, सुरक्षा तपासणीनंतर पुढील वर्षी नव्या तारखेला नेतान्याहू यांचा दौरा ठरवला जाईल. उल्लेखनीय म्हणजे यावर्षीच्या शेवटी पंतप्रधान मोदी आणि नेतान्याहू यांच्यात भेट होणार होती, ज्यासाठी इस्रायली पंतप्रधान भारतात येणार होते. यापूर्वीही बेंजामिन नेतान्याहू यांनी भारत दौरा रद्द केला आहे. 9 सप्टेंबर रोजी ते एक दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार होते, परंतु इस्रायलमध्ये 17 सप्टेंबरला निवडणुका असल्याने शेड्यूलमध्ये अडचणी आल्या आणि त्यांनी दौरा रद्द केला. एप्रिलमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.

नेतान्याहू जानेवारी 2018 मध्ये भारतात आले होते. तर पंतप्रधान मोदी 2017 मध्ये इस्रायलला गेले, आणि इस्रायलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. दोन्ही नेत्यांमधील घनिष्ठ नातेसंबंध आणि समन्वय यांची चर्चा दोन्ही देशांच्या माध्यमांमध्ये कायम होत असते.यापूर्वी नेतान्याहू यांच्या राजकीय पक्षाने पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे फोटो शेअर केले होते. हे जगभर आपली ताकद दाखवण्याचा एक प्रयत्न मानला गेला. नेतान्याहूंचा या वेळचा भारत दौरा देखील या प्रतिमेला बळकटी देण्याच्या प्रयत्नांपैकी एक भाग होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

 rajesh pande