
काबुल, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले रात्रीच्या वेळी, लोक झोपेत असताना करण्यात आला. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे तर ४ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांची माहिती अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबिउल्लाह यांनी दिली.
सोशल मीडिया एक्स पर पोस्ट करत जबिउल्लाह यांनी सांगितले कि, रात्री सुमारे 12 वाजता पाकिस्तानकडून हवाई हल्ले करण्यात आले, ज्यात 9 मुलांसह 10 जणांचा मृत्यू झाला आणि ४ नागरिक जखमी झाले. त्यांनी सांगितले की हे हल्ले खोस्त, कुनर-पक्तिका या भागांमध्ये झाले, जिथे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे.तालिबानने सांगितले की पाकिस्तानने कुनार आणि पक्तिका प्रांतांमध्येही छापे टाकले, ज्यात चार सामान्य नागरिक जखमी झाले. हे छापे पाकिस्तानच्या पेशावरमध्ये सोमवारी झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांनंतर करण्यात आले, ज्यात तीन पॅरामिलिटरी जवानांचा मृत्यू झाला होता.
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैन्यामध्ये चकमक झाली होती, ज्यात अनेक जण ठार झाले. दोन्ही बाजूंनी ऑक्टोबरमध्ये दोहामध्ये युद्धविराम (सीजफायर) करार केला होता, परंतु अफगाणिस्तानच्या आत कार्यरत पाकिस्तानविरोधी दहशतवादी गटांवर असलेली मतभिन्नता यामुळे तुर्कीतील शांतता चर्चासत्रे कोणताही दीर्घकालीन करार न होता कोसळली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode