
अयोध्या, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : रामजन्मभूमी मंदिराच्या शिखरावरील केशरी ध्वज नव्या भारताचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
अयोध्येत श्रीराम मंदिराच्या शिखरावर केशरी ध्वज फडकवल्यानंतर ते बोलत होते.
याप्रसंगी आदित्यनाथ म्हणाले की, गेल्या 500 वर्षांमध्ये सत्ता आणि पिढ्या बदलल्या, परंतु भारतीयांच्या आस्थेने कधीही न झुकता आणि न थांबता आपली श्रद्धा कायम राखली. जेव्हा संघटनात्मक नेतृत्व संघाच्या हातात आले, तेव्हा एकच आवाज ऐकू आला. “रामलला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे...... लाठी-गोली खाएंगे लेकिन मंदिर वही बनाएंगे” ‘हे भव्य मंदिर 140 कोटी भारतीयांची आस्था आणि स्वाभिमान दर्शवते. त्यांनी त्या सर्व ‘कर्मयोगींना’ शुभेच्छा दिल्या ज्यांनी या कार्यासाठी आपले बलिदान दिले. हा ध्वज धर्माच्या अमरतेचा आणि रामराज्याच्या तत्त्वांचा प्रतीक असल्याचे योगींनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये भारताच्या करोडो नागरिकांच्या हृदयात जागलेली आस्था आज या भव्य श्रीराम मंदिराच्या स्वरूपात दिसून येत आहे. भगवा ध्वज धर्म, ईमानदारी, सत्य, न्याय आणि ‘राष्ट्रधर्म’ यांचा प्रतीक आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी