एक्सने ‘अबाऊट दिस अकाउंट’ फीचर केले लाँच
मुंबई, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। एलॉन मस्क यांच्या मालकीच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मने ‘अबाऊट दिस अकाउंट’ नावाचं नवं फीचर लाँच केलं असून यामुळे वापरकर्त्यांना कोणत्याही एक्स अकाउंटची पार्श्वभूमी आणि इतिहास तपासण्याची सुविधा मिळणार आहे. या फी
X launches ‘About This Account


मुंबई, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। एलॉन मस्क यांच्या मालकीच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मने ‘अबाऊट दिस अकाउंट’ नावाचं नवं फीचर लाँच केलं असून यामुळे वापरकर्त्यांना कोणत्याही एक्स अकाउंटची पार्श्वभूमी आणि इतिहास तपासण्याची सुविधा मिळणार आहे. या फीचरमध्ये संबंधित अकाउंटची लोकेशन, युजरनेम किती वेळा बदललं, प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा कधी जॉईन झाले आणि अकाउंट कुठून ऍक्सेस केले जात आहे यासारखी महत्त्वाची माहिती दिसेल.

एक्सचे हेड ऑफ प्रॉडक्ट निकिता बियर यांनी सांगितलं की, हे फीचर वापरकर्त्यांना पुरेशी माहिती मिळावी आणि एखादं प्रोफाईल खरे आहे की बनावट हे ओळखता यावं यासाठी विकसित करण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, जर एखादं अकाउंट भारतात असल्याचा दावा करत असेल पण त्याची ऍक्टिव्हिटी परदेशातून दिसत असेल, तर त्याबाबत शंका निर्माण होऊ शकते आणि अशा परिस्थितीत हे फीचर उपयुक्त ठरणार आहे.

काही देशांमध्ये राजकीय किंवा सामाजिक मतांमुळं वापरकर्त्यांना शिक्षा होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी ‘प्रायव्हसी टॉगल्स’ सुविधा देखील देण्यात आली आहे. यामुळं वापरकर्ते आपलं नेमकं शहर किंवा राज्य न दाखवता केवळ देश किंवा रिजनची माहिती प्रदर्शित करू शकतात. निकिता बियर यांनी ऑक्टोबर महिन्यात स्वतःच्या आणि काही एक्स कर्मचाऱ्यांच्या प्रोफाईलवर या फीचरची चाचणी केली होती आणि आता ते सर्वांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध केलं जात आहे.

हे फीचर पाहण्यासाठी वेबसाइट किंवा मोबाईल अ‍ॅपवर प्रोफाईलमधील ‘Joined’ या तारखेवर क्लिक केल्यास ‘अबाऊट दिस अकाउंट’ पेज उघडतं, ज्यात जॉईन केलेली तारीख, प्रायमरी लोकेशन (देश/रिजन), युजरनेम बदलण्याचा इतिहास आणि अॅप कोणत्या स्टोअरमधून डाउनलोड करण्यात आलं याची माहिती दिसते. सध्या हे फीचर पूर्णपणे रोलआऊट झालं असलं तरी अनेक वापरकर्त्यांना इतरांच्या प्रोफाईलवर ही माहिती अद्याप दिसत नाही. लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा आहे. प्रायव्हसी आणि सेफ्टी सेटिंग्जमध्ये जाऊन वापरकर्ते आपली माहिती प्रमाणित करू शकतात आणि लोकेशन फक्त देश किंवा रिजन दाखवण्याचा पर्याय निवडू शकतात.

इंस्टाग्रामवरही अशाच प्रकारचं पारदर्शकता फीचर आधीपासून उपलब्ध असून एक्सचं हे पाऊल फेक अकाउंट्स, बॉट्स आणि दिशाभूल करणाऱ्या प्रोफाईल्सविरुद्ध लढण्यासाठी महत्त्वाचं मानलं जात आहे. कंपनीच्या मते, यामुळे वापरकर्त्यांचा विश्वास वाढेल आणि प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित बनेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande