
जळगाव, 3 नोव्हेंबर (हिं.स.) दिवाळीनंतर सोनं-चांदींत मोठी घसरण दिसून आली. यामुळे आता लग्नसराईसाठी दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला. मात्र नोव्हेंबर महिन्याच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १७० रुपयांनी वाढले आहेत. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,२३,१७० रुपये खर्च करावे लागणार आहे.तर २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१२,९०० रुपये मोजावे लागणार आहे. ४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाल्याचे दिसत आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १३० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९२,३८० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे सोनं काल ९२,२५० रुपये खर्च करावे लागले. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,३०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,२३,८०० रुपये मोजावे लागणार आहेत. काल हेच सोनं खरेदीसाठी ९,२२,५०० रुपयांना विकले गेले. सोन्यासोबतच चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्यासोबत चांदी खरेदीसाठी ग्राहकांना जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. आज १ ग्रॅम चांदीच्या दरामध्ये २ रुपयांमध्ये वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी १५४ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये २००० रुपयांनी वाढ झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,५४,००० रुपये खर्च करावा लागेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर