
बीड, 3 नोव्हेंबर (हिं.स.)राज्याच्या क्रीडाक्षेत्रात बीडचा झेंडा आणखी उंच फडकावा, अशी अपेक्षा बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे. बीड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल शालेय क्रीडा स्पर्धेच्या भव्य उद्घाटन समारंभात आमदार क्षीरसागर बोलत होते. राज्यभरातून खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत
राज्यभरातून आलेल्या गुणी खेळाडूंची जिद्द, शिस्त आणि क्रीडाप्रेम पाहून अभिमान वाटला. आजची ही स्पर्धा केवळ विजेतेपदासाठीची लढत नसून, नव्या महाराष्ट्राच्या निरोगी व सक्षम पिढी घडविण्याच्या दिशेने टाकलेले प्रेरणादायी पाऊल आहे. पुढाकार घेऊन राज्यस्तर स्पर्धांचे आयोजन यजमानपद आपल्या जिल्ह्याला मिळाले आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. असेही क्षीरसागर म्हणाले.
ग्रामीण भागातील मुलांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावे
- खेळाडू घडावेत, फक्त बक्षीस नव्हे तर भवितव्य मिळावे
- क्रीडा क्षेत्राला प्रमुख दर्जा, निधी व प्रोत्साहन मिळावे हीच भूमिका असल्याचा त्यांनी उल्लेख केला
यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॅन्सन , पोलिस अधिक्षक श्री. नवनित कॅवत, आमदार श्री. विक्रम काळे तसेच क्रीडा विभागाचे उपसंचालक श्री. शेखर पाटील, मा.आ. सय्यद सलीम यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. या उपक्रमासाठी मेहनत घेतलेल्या सर्व अधिकारी वर्ग, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना मन:पूर्वक शुभेच्छा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis