
मुंबई, 3 नोव्हेंबर (हिं.स.) - राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आज एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबई येथे हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. विख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी त्यांना पुढील काही दिवस कोणालाही भेटता येणार नाही अश्या सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन आपल्या कार्यात पुन्हा सक्रिय होणार आहेत, अशी माहिती भुजबळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी