
बीड, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हानिहाय बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रॉयल हॉल,वरळी डोम' येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये बीड जिल्हा आणि जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थां बाबतीत सर्व यथोचित निवडणूकी बाबतचा आढावा दिला गेला.
जिल्ह्यातील पक्ष संघटनेची सध्याची स्थिती, आगामी निवडणुकांची रणनीती तसेच जनतेच्या प्रश्नांवर पक्षाची ठाम भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिव-फुले-शाहू-आंबेडकर आणि स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा प्रसार करावा, सर्व जाती-धर्मातील बांधवांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पूर्णपणे सज्ज असून, जनतेच्या विश्वासाचा विजय निश्चित असल्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
-----------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis