नाशिक - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बुधवारी बालाजी मंदिरात दीपोत्सव
नाशिक, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। - शंकराचार्य न्यासाच्यावतीने बुधवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून लक्ष पणत्यांचा दीपोत्सव होणार आहे. विभागीय महसूल आयुक्त प्रविण गेडाम यांच्या हस्ते बालाजी मंदिरात तर पद्मावती मंदिरात शासकीय वैद्यकीय महा
नाशिक - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बुधवारी बालाजी मंदिरात दीपोत्सव


नाशिक, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।

- शंकराचार्य न्यासाच्यावतीने बुधवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून लक्ष पणत्यांचा दीपोत्सव होणार आहे.

विभागीय महसूल आयुक्त प्रविण गेडाम यांच्या हस्ते बालाजी मंदिरात तर पद्मावती मंदिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका डॉ. प्रा. प्रतिमा गेडाम यांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलित होईल. नाशिककर या उत्सवात दरवर्षी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. त्यांच्या सुविधेसाठी गंगापूर रस्त्यावरील न्यासाच्या प्रशस्त जागेत वाहनतळाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना तेथून मंदिरापर्यंत आणि परत पार्किंगपर्यंत मोफत रिक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिकच्या एलआयसी अधिकारी वर्गाकडून जीवन सेतू भाविकांच्या पादत्राणाचा सांभाळ या उपक्रमांतर्गत चरणसेवा करण्यात येईल. शंकराचार्य समाधी मंदिराच्या बाजूने भाविक पद्मावती, महालक्ष्मी, बालाजीचे दर्शन घेऊन गणपती मंदिराच्या बाजूने बाहेर पडतील. प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग असल्याने कोठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. मंदिर प्रांगणात श्री गुरुजी रुग्णालयातर्फे प्रथमोपचाराची सुविधा करण्यात आली आहे. भाविकांनी शिस्तबद्धतेने दीपोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन शंकराचार्य न्यास विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande