
छत्रपती संभाजीनगर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हानिहाय आढावा बैठक घेतली.या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नेते आणि पदाधिकारी यांच्याशी त्यांनी थेट संवाद साधला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या काही भागांचाही आढावा घेतला आहे.
जिल्ह्यांतील पक्षाची सध्याची स्थिती, संघटनात्मक रचना तसंच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीबाबत सखोल चर्चा करण्यात आली.या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांशी मुक्त संवाद साधला, सर्वांना संघटन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि पुढील निवडणुकीसाठी उत्साहानं कामं करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर मला विश्वास आहे की, ते जनतेच्या मनात आपली छाप उमटवतील आणि पक्ष अधिक बळकट करतील.एकजुटीनं आणि जनतेच्या ठाम विश्वासानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विकासासाठी सज्ज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis