निवृत्ती वेतनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यत हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन
नांदेड, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्हा कोषागाराअंतर्गत निवृत्तीवेतन घेणारे सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटूंब निवृत्ती वेतनधारकांनी 30 नोंव्हेबर 2025 पर्यत हयात असलेबाबत दाखला सादर करणे आवश्यक आहे. आपला हयात असलेबाबतचा दाखला नोंदविण्यासाठी बँकेत ह
निवृत्ती वेतनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यत हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन


नांदेड, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्हा कोषागाराअंतर्गत निवृत्तीवेतन घेणारे सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटूंब निवृत्ती वेतनधारकांनी 30 नोंव्हेबर 2025 पर्यत हयात असलेबाबत दाखला सादर करणे आवश्यक आहे. आपला हयात असलेबाबतचा दाखला नोंदविण्यासाठी बँकेत हयात दाखला यादी पाठविण्यात आली आहे. तरी राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटूंबनिवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यत हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले आहे.

आपले निवृत्तीवेतनधारक खाते असलेल्या बँकेच्या शाखेत जावून बँक अधिकाऱ्यांच्या समक्ष हयात दाखल्याच्या यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी. https:-jeevanpramaan.gov.in जीवनप्रमाण या संकेतस्थळावर जावून ऑनलाइन पध्दतीने हयात दाखला सादर करता येईल. हयातीच्या प्रमाणपत्रावर बँक अधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांच्या समक्ष स्वाक्षरी करुन जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करता येईल. निवृत्तीवेतनधारक काही कारणानिमित्त परदेशात असल्यास तेथील भारतीय राजदूत मार्फत हयातीचा दाखला संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करता येईल. भारतीय डाक विभागात इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) च्या माध्यमातून डिजीटल हयातीचा दाखला ऑनलाईन सादर करण्याची सुविधा सशुल्क उपलब्ध करुन दिलेली आहे. ॲनड्राईड स्मार्टफोन, आयओएस मोबाईल फोनवर जीवन प्रमाण अप्लीकेशन डाऊनलोड करुन ऑनलाइन पध्दतीने हयात दाखला सादर करता येईल याची नोंद निवृत्तीवेतनधारक व कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande