पीक गेल्याच्या धक्क्याने शेतकऱ्याची आत्महत्या, हंगामातील पहिला बळी
निफाड, 3 नोव्हेंबर (हिं.स.) - द्राक्षाचे पीक हातून गेल्याच्या धक्क्याने तालुक्यातील उगाव येथील प्रगतिशील शेतकरी श्री कैलाश यादवराव पानगव्हाणे हे आज सकाळी आठ वाजता आपल्या द्राक्ष बागेमध्ये चक्कर मारत असताना त्या ठिकाणी त्यांना द्राक्ष बागेची अतिशय
पीक गेल्याच्या धक्क्याने शेतकऱ्यांनी केली आत्महत्या, या हंगामातील पहिला बळी


निफाड, 3 नोव्हेंबर (हिं.स.) - द्राक्षाचे पीक हातून गेल्याच्या धक्क्याने तालुक्यातील उगाव येथील प्रगतिशील शेतकरी श्री कैलाश यादवराव पानगव्हाणे हे आज सकाळी आठ वाजता आपल्या द्राक्ष बागेमध्ये चक्कर मारत असताना त्या ठिकाणी त्यांना द्राक्ष बागेची अतिशय बिकट अवस्था जाणवल्याने त्यांनी त्या ठिकाणी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांना निफाड सिव्हिल येथे दाखल करण्यात आले मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान या हंगामामध्ये हा पहिला बळी गेला आहे.

मागील काही दिवसापासून सातत्याने जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे द्राक्षांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे द्राक्षां बरोबरच इतरही पिके हे आता शेतकऱ्यांची हातून जातात की काय अशी परिस्थिती आहे तरी देखील जिल्ह्यामध्ये पाऊस थांबण्याचा नाव घेत नाही यामुळेच शेतकरी आता मेटाकोटीला आले असून त्यातूनच पानगव्हाणे यांनी हताश होऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत निफाड पोलीस कार्यालयात मयत शेतकरी कैलास यादवराव पानगव्हाणे यांचे पुतणे शुभम विलास पानगव्हाणे यांनी माहिती दिली की ,सोमवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास माझे घरी बसलेलो असतांना चूलती आशा कैलास पानगव्हाने यांनी लवकर आमचे घरी या. कारण कैलास यादवराव पानगव्हाणे हे घरातील कॉटवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत . धावत त्यांचे घरी गेलो व बघितलेअसता चूलते कैलास यादवराव पानगव्हाणे वय ४४ हे सकाळी मळ्यात चक्कर मारायला गेले व त्यानंतर ते घरी आले व त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर ते घरातील कॉटवर बेशुद्ध होवून खाली पडले. त्यानंतर त्यांचे तोंडाला फेस देखील येत होता. त्यामुळे शुभम पानगव्हाणे अक्षय कैलास पानगव्हाणे, शेजारी रहाणारे सूनिल नामदेव पानगव्हाणे यांनी लोगान गाडीमध्ये टाकून निफाड सरकारी दवाखान्यात आणले तेथील डॉक्टरांनी तपासून कैलास यादवराव पानगव्हाणे यांनामृत घोषित केले.

याबाबत निफाड पोलीस कार्यालयात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास निफाड पोलीस निरीक्षक श्री गणेश गुरुव याचे मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस करीत आहेत. निफाड शेत तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी या संदर्भात बोलताना याबाबत अहवाल प्राप्त झाला असून अधिक माहिती कृषी अधिकारी यांचे मार्फत संकलित करून ती जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येईल असे सांगितले.

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande