
मुंबई, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। होंडा कार्स इंडिया लिमिटेडनं (एचसीआयएल) भारतात आपल्या लोकप्रिय एसयूव्ही ‘होंडा एलिव्हेट’चा नवीन फ्लॅगशिप व्हेरिएंट ‘एलिव्हेट एडीव्ही एडिशन’ सादर केला आहे. तरुण आणि डायनॅमिक जीवनशैली असलेल्या ग्राहकांसाठी डिझाइन केलेली ही विशेष आवृत्ती स्पोर्टी एक्स्टिरियर आणि आकर्षक इंटिरियर अपग्रेड्ससह येते. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 15.29 लाख रुपयांपासून सुरू होते.
या नव्या एडिशनमध्ये 1.5 लिटर i-VTEC पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह (पॅडल शिफ्टर्ससह) उपलब्ध आहे. पॉवर आणि टॉर्क आकडेवारी पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली असून, ड्रायव्हिंग अनुभव अधिक रिफाइंड करण्यात आला आहे. एक्स्टिरियरमध्ये ग्लॉसी ब्लॅक अल्फा-बोल्ड प्लस फ्रंट ग्रिल, ब्लॅक सराउंड आणि हूड डेकलवर बोल्ड ऑरेंज हायलाइट्स देण्यात आले आहेत, जे एसयूव्हीला कमांडिंग आणि अॅडव्हेंचरस लूक देतात.
ब्लॅक-आउट एलिमेंट्समध्ये रूफ रेल्स, ORVMs, अप्पर ग्रिल मोल्डिंग, डोअर व विंडो मोल्डिंग्स, शार्क फिन अँटेना आणि डोअर हँडल्सचा समावेश आहे. याशिवाय, ऑरेंज हायलाइट असलेले बंपर स्किड गार्निश, एडीव्ही फेंडर एम्ब्लेम्स, ऑरेंज फॉग लाइट गार्निश, ADV-ब्रँडेड डोअर डेकल्स आणि ब्लॅक अलॉय व्हील्सवरील ऑरेंज अॅक्सेंट्स या एसयूव्हीच्या स्पोर्टी लूकला अधिक उठाव देतात. रियर भागात ऑरेंज स्किड गार्निश, बॉडी-कलर्ड स्किड प्लेट आणि ड्युअल-टोन व्हेरिएंटसाठी ब्लॅक-आउट C-पिलर देण्यात आला आहे.
इंटिरियरमध्ये पूर्ण ऑल-ब्लॅक थीम असून, त्यावर बोल्ड ऑरेंज स्टिचिंग आणि अॅक्सेंट्स दिले आहेत. सीट्सवर एडीव्ही लोगो तसेच फ्रंट आणि रियर दोन्ही ठिकाणी ऑरेंज स्टिचिंग दिसते. एसी नॉब्स, गियर नॉब मोल्डिंग आणि डोअर ट्रिम्सवर ऑरेंज डिटेलिंग देऊन केबिनला प्रीमियम आणि स्पोर्टी टच दिला आहे.
सेफ्टीच्या दृष्टीने या एडिशनमध्ये ‘होंडा सेंसिंग’ ADAS सूट देण्यात आली आहे. यात कॉलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टम, लेन कीप असिस्ट, रोड डिपार्चर मिटिगेशन, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लीड कार डिपार्चर नोटिफिकेशन यांसारखी आधुनिक फीचर्स आहेत.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही एसयूव्ही तरुण ग्राहकांना त्यांच्या अॅक्टिव्ह आणि अॅडव्हेंचरस जीवनशैलीशी जुळणारी अनुभव देईल. ब्लॅक-ऑरेंज कॉम्बिनेशन, आकर्षक डिझाइन आणि अत्याधुनिक सेफ्टी फीचर्समुळे होंडा एलिव्हेट एडीव्ही एडिशन प्रीमियम एसयूव्ही बाजारात एक नवीन आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule