
सोलापूर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। कार्तिक एकादशीचा सोहळा मोठ्या भावाने पार पडला. मात्र कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या भाविकांच्या संख्येवरून मत मतांतरे असल्याचे समोर आली आहे. यावर्षी अतिवृष्टी व. महापूर या संकटामुळे भाविकांची कमी असल्याचे स्थानिक दुकानदार व व्यापारी सांगत असले तरी पोलिसांनी मात्र 13 ते 14 लाख भाविक आल्याचा दावा केला आहे. पोलिसांचा दावा खरी की अनेक वर्षांपासून वारीची गर्दी अनुभवनार्या व्यापाच्या अंदाज खरा याची चर्चा पंढरपुरात सुरू झाली आहे. सरकारी पातळीवरून गर्दीचे आकडे फुगवून सांगितले जात असल्याचा आरोप ही काही स्थानिकांनी केला आहे.मागील आषाढी यात्रेच्या वेळी पहिल्यांदा एआय तंत्रज्ञानाचा वापर केला होता. त्यावेळी ड्रोन च्या माध्यमातून वारीसाठी आलेल्या भाविकांचे हेड काउंट करण्यात आले होते. त्यावेळी तब्बल 22 लाख भाविक आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता कार्तिकी यात्रेसाठीही तब्बल 13 ते 14 लाख भाविक आल्याचा दावा जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी आज पंढरपुरात केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर आता कार्तिकीसाठी आलेल्या भाविकांच्या संख्येवरून मतमतांतरे समोर आली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड