
बीड, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सोमवारी बीड येथील स्व. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांची भेट घेतली.गेली अनेक महिन्यांपासून महादेव मुंडे यांच्या खूनाचा तपास सुरु आहे. परंतु अद्यापही एकाही मारेकऱ्याला गजाआड करण्यात आले नाही.
यासाठी ज्ञानेश्वरीताई सातत्याने लढा देत आहेत. त्यांच्या या लढ्यात आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महादेव मुंडे यांची हत्या करणाऱ्यांना जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही आणि ज्ञानेश्वरीताई व कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis